शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत टाकले विषारी द्रव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 12:35 IST

गावातील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत कुणीतरी अज्ञात इसमाने टाकलेल्या विषारी द्रव्यामुळे मासोळ्यांचा मृत्यू झाला. आजनडोह येथे हा प्रकार उघड झाल्याने पाणी पुरवठा करणाऱ्याने नळाद्वारे पाणी सोडले नसल्याने मोठा अनर्थ टळला

ठळक मुद्देनागरिकांत दहशत मासोळ्यांचा मृत्यू झाल्याने घटना उघड

आॅनलाईन लोकमतवर्धा : गावातील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत कुणीतरी अज्ञात इसमाने टाकलेल्या विषारी द्रव्यामुळे मासोळ्यांचा मृत्यू झाला. आजनडोह येथे हा प्रकार उघड झाल्याने पाणी पुरवठा करणाऱ्याने नळाद्वारे पाणी सोडले नसल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र या प्रकारामुळे गावकऱ्यांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे तातडीने लक्ष देत पाण्याचे निर्जंतुकीकरण करून नागरिकांची पाण्याची समस्या मार्गी लावावी अशी मागणी होत आहे.नळाला येणाऱ्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने महिलांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. महिलांना विहिरीवरून किंवा मिळेल तेथून पाणी डोक्यावरून आणावे लागत आहे. त्यामुळे महिलांना या सणासुदीच्या दिवसात पाणी आंघोळी, स्वयंपाक या गोष्टीचा विचार करावा लागत असून याकडे तातडीने लक्ष देवून पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा व पाण्याचे परिक्षण करावे, अशी मागणी सर्वत्र होत आहे.येथील नळयोजनेची विहीर गावापासून अर्ध्या किलोमिटर अंतरावर नदीलगत आहे. या विहिरीवरून गावाला पाणीपुरवठा होतो. या विहिरीवरून पाणी सोडण्याचे काम गुणवंता वाढवे नामक व्यक्ती काम करीत आहे. रोज सकाळी विहिरीवर जात व्यवस्थित पाणी सोडण्याचे काम सुरू होते. तो नित्याप्रमाणे सकाळी विहिरीवर पाणी सोडण्याकरिता गेला असता पाण्यावर मासोळ्या, बेडूक मृतावस्थेत तरंगताना दिसल्या. त्यामुळे त्याने पाणी न सोडता संबंधित सरपंच व उपसरपंचांना प्रकाराची माहिती देताच त्याने पाणी सोडण्यास मनाई केली.नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होणार नाही याची दक्षता घेण्याकरिता विहिरीतील पाण्याचा उपसा करण्यात आला. या प्रकरणाची दखल घेत सचिव देशमुख, सरपंच व उपसरपंचांनी कारंजा पोलिसात सदर प्रकाराची तक्रार दाखल केली आहे. पाण्याची तपासणी करण्याकरिता आरोग्य निरीक्षकांना पाचारण करून नमुने दिलेले आहेत.पाणी सोडणाऱ्याने विहिरीत न बघताच पाणी सोडले असते तर त्या गावात आज लहानमुले, माणसांना काय झाले असते हे सांगणे कठीणच आहे. असे हे कृत्य करणाऱ्याला काय म्हणावे हे अवघड आहे. तरी गावकऱ्यांनी यापुढे सर्तकता बाळगत ग्रामपंचायतला सहकार्य करावे.- एस.आर. देशमुख, सचिव ग्रामपंचायत, कन्नमवारग्राम