शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिळ्या अन्नातून विषबाधा; १३ जनावरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 23:43 IST

येथील नदीपात्राच्या काठावर टाकलेले शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधेमुळे १३ जनावरांचा मृत्यू झाला; तर १५ जनावरे अत्यवस्थ आहेत. ही घटना शुक्रवारी घडल्याने शंकरजी देवस्थान परिसरात राहणाऱ्या तीन पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देपशुपालकांवर संकट : १५ जनावरे अत्यवस्थ

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : येथील नदीपात्राच्या काठावर टाकलेले शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधेमुळे १३ जनावरांचा मृत्यू झाला; तर १५ जनावरे अत्यवस्थ आहेत. ही घटना शुक्रवारी घडल्याने शंकरजी देवस्थान परिसरात राहणाऱ्या तीन पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे.महाप्रसादाच्या कार्यक्रमातील शिल्लक राहिलेले अन्न; नदीपात्राच्या काठावर टाकण्यात आले होते. हे शिळे अन्न शंकरजी देवस्थान परिसरात राहणाºया गजानन ज्ञानेश्वर वाघमारे, उरकुडा कोंडबा समर्थ व सुरेंद्र उमरे यांच्या जनवारांनी खाल्ले. त्यामुळे विषबाधा झाल्याने गजानन वाघमारे यांच्या दोन म्हशी, तीन बकºया व सहा गायींचा मृत्यू झाला, तर दहा जनावरे आजारी आहे. उरकुडा समर्थ यांची एक बकरी तर सुरेंद्र उमरे यांची एक म्हैस दगावली आहे. या तीनही पशुपालकांचे १५ जनावरे अत्यवस्थ असल्याने त्यातील काही जनावरे मृत्यूच्या दाढेत असल्याचे सांगण्यात येत आहे.अन् मृत्यूसंख्या वाढत गेलीपशुधन पर्यवेक्षक जी.एस. संगीतवार यांनी घटना कळल्यावर खाजगी मेडिकल स्टोअर्समधून औषधी व सलाईन मागवून उपचार सुरू केले. मात्र एकट्या कर्मचाºयाच्या ते आवाक्याबाहेर होते. सकाळी मृत पावलेल्या जनावरांचा आकडा दुपारी सहावरून तेरावर पोहचला.तलाठी पवार यांनी पंचनामा केल्यानंतर दुपारी अडीच वाजताच्यादरम्यान पशुधन विकास अधिकारी डॉ. मिना काळे यांनी घटनास्थळी येवून मृत जनावरांचे शवविच्छेदन केले. त्यानंतर पशुपालकांनी जनावरांवर मातीत पुरून अंत्यसंस्कार केले. यावेळी गरीब पशुमालकांच्या डोळ्यातून अश्रूंनी वाट मोकळी केली.पशुधन विकास अधिकारी डॉ. मिना काळे तात्काळ घटनास्थळी पोहचून त्यांनी आवश्यक औषधी उपलब्ध करून दिली असती तर अनेक जनावरांवर उपचार होवून त्यांचे जीव वाचले असते. सर्व पशुमालक भूमिहीन असल्याने शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली. घटनास्थळी माजी जि.प अध्यक्ष विजय जयस्वाल व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक डॉ. राजेश जयस्वाल यांनी भेट देवून पशुलकांशी चर्चा केली.