शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

युवकांचे कचऱ्याने ‘जेब भरो’

By admin | Updated: July 10, 2017 00:55 IST

शहरातील वाढती अस्वच्छता आणि साठलेले कचऱ्याचे ढीग हे आजाराला निमंत्रण देणारे ठरत आले.

युवा परिवर्तनचा सहभाग : स्वच्छता आंदोलनाचा आठवा टप्पालोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील वाढती अस्वच्छता आणि साठलेले कचऱ्याचे ढीग हे आजाराला निमंत्रण देणारे ठरत आले. युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संघटनेच्यावतीने शहरातील प्रभागात प्रत्येक शनिवार व रविवारी स्वच्छता आंदोलन केले जाते. याच आंदोलनात प्रभाग क्रमांक आठ मध्ये स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खिशात कचरा भरून घेत जेब भरो आंदोलन करुन प्रशासनाचा निषेध नोंदविला.यावेळी प्रभागातील नागरिकांनी कार्यकर्त्यांकडे अस्वच्छता व त्यामुळे होणाऱ्या दुर्गंधी व वाढत्या रोगराईकडे नगरपालिकेचे होणारे दुर्लक्ष याबाबत समस्या मांडल्या. पालिकेने स्वच्छता अभियान राबविले मात्र ते वरवरचे होते, अशा शब्दात तीव्र रोष व्यक्त केला. प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत पावडे चौक, गोंड प्लॉट, पठाण यांच्या घराजवळील परिसर, सराफ गॅस एजन्सी व परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जनतेशी संवाद साधला. प्रभागात कुठेच कचरा पेट्या ठेवलेल्या नाहीत. त्यामुळे कचरा रस्त्यावर टाकावा लागतो. काही ठिकाणी तर कचरा फेकायला जागा नाही. नाल्या वेळेवर साफ होत नाही. लोकप्रतिनिधी समस्या सांगितल्यावर दुर्लक्ष करतात. काम पूर्ण होईल असे आश्वासन देण्यात येते. हा प्रभाग एकप्रकारे डम्पींग झोन झाल्यासारखा आहे. येथे कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा वाजला आहे. नाल्या सफाई केल्यावर बाहेर काढलेला कचरा कित्येक दिवस नाल्यांच्या बाजुला पडून असतो, याकडे लक्ष देण्याची मागणी केली. आंदोलनात निहाल पांडे, पलाश उमाटे, प्रगती देशकर, प्रिती घंगाळ, जयंती मिश्रा, अक्षय बाळसराफ, सोनू दाते, सौरभ माकोडे, शैलेश पंचेश्वर, धरम शेंडे, आकाश हातागळे आदींचा सहभाग होता. स्वच्छता कराचा निषेधप्रभागातील वाढत्या कचऱ्याचे प्रमाण पाहता नागरिकंनी स्वच्छता कर का भरावा, असा प्रश्न उपस्थित केला. दुर्गंधी, अस्वच्छता यामुळे डासांची उत्पत्ती होते. ही बाब रोगराईला निमंत्रण देत आहे. याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. लोकप्रतिनिधी नागरिकांच्या व्यथा ऐकायला तयार नाही, अशी व्यथा यावेळी मांडली.