शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांनी शहीद परिवाराची जाहीर माफी मागावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 22:31 IST

शहीद हेमंत करकरे याचा अवमान करणाºया मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंगला देशद्रोही घोषित करून कारवाई करावी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद परिवाराची माफी मागावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देविविध संघटनांची मागणी । जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहीद हेमंत करकरे याचा अवमान करणाºया मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंगला देशद्रोही घोषित करून कारवाई करावी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद परिवाराची माफी मागावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.या घटनेसंदर्भात शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शनेही करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सुनील ढाले, भरत कोकावार, पंकज सत्यकार, समीर राऊत, अविनाश काकडे, नूतन माळवी, सुधीर पांगुळ, पंकज इंगोले, विनय राहाटे, विक्की सवाई, कमलाकर पिंगळे, सतीश देवढे, रमेश आत्राम, विशाल हजारे, सुधीर देशमुख, विनोद चौधरी, चंद्रशेखर बुरांडे, दीपक देशमुख, प्रशांत झाडे, मिलिंद मोहोड, प्रभाकर धोटे, पंकज इंगोले आदी उपस्थित होते.२६/११ च्या दहशतवादी हल्यामध्ये तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांचे बलिदान हे देशातील भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या भोपाळ येथील लोकसभा उमेदवार व मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग हिने शहीद हेंमत करकरे यांना दहशतवादी संबोधून संपूर्ण शहिदांचा व त्यांच्या परिवाराचा अवमान केला आहे. प्रज्ञा सिंग हिचे वक्तव्य देश विघातक असल्याने तिला देशद्रोही घोषित करून कारवाई करावी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद परिवाराची व जनतेची माफी मागावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी निवेदनातून केली आहे. निवेदन देतांना सत्यशोधक महिला प्रबोधिनी, समता परिषद, संभाजी ब्रिगेड, वीर अशोक सम्राट संघटना, युवा सोशल फोरम आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. नरेंद्र दाभोळकर, अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या मारेकरांना त्वरित अटक करावी, अशीही मागणी करण्यात आली. याबाबत राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांनाही निवेदन पाठविण्यात आले. तसेच समुद्रपूर येथेही या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाºयांनी सभा घेऊन साधवी प्रज्ञा सिंग यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. यावेळी नगर पंचायतीचे गटनेते मधुकर कामडी, नगरसेवक आशिष अंड्रस्कर, राहुल लोहकरे, देवानंद देवढे, किशोर आस्कर, बंडू शेंडे, महेंद्र शिरोडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. मेहेर बाबा ग्रामीण पतसंस्थेत निषेध सभा घेण्यात आली. यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते सय्यद शफात अहमद, आनंदराव थुटे, मनोहर सायंकार आदी उपस्थित होते.

टॅग्स :Malegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोट