शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

पीडित शेतकरी कुटुंबाची चेष्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:57 IST

नजीकच्या पळसगाव (बाई) येथील शेतकरी राजू विश्वनाथ भट यांच्या शेतात अंदाजे १०० वर्ष जुने सागाचे असलेले झाड तोडण्यासाठी पॉवर ग्रीडचे अधिकारी कोणतीही पूर्वसूचना न देता शासकीय यंत्रणेचा व पोलीस प्रशासनाचा जोर वापरून शेतात आले.

ठळक मुद्देपॉवर ग्रीड कंपनीचा प्रकार : मोबदल्यासाठी झालेली बैठक निष्फळ

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : नजीकच्या पळसगाव (बाई) येथील शेतकरी राजू विश्वनाथ भट यांच्या शेतात अंदाजे १०० वर्ष जुने सागाचे असलेले झाड तोडण्यासाठी पॉवर ग्रीडचे अधिकारी कोणतीही पूर्वसूचना न देता शासकीय यंत्रणेचा व पोलीस प्रशासनाचा जोर वापरून शेतात आले. यादरम्यान शेतात लीला भट व तिचे दोन मुलंही शेतात काम करीत होते. लीला यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विनंती केली की, आम्हाला जोपर्यंत झाडांचा योग्य मोबदला देत नाही तोपर्यंत झाडे तोडू देणार नाही. आम्हाला १० ते १२ दिवसाचा अवधी द्या आम्ही कायदेशीर प्रक्रिया करायची आहे. परंतु मुजोर अधिकारी यांनी लिला यांच्याकडे दुर्लक्ष केले. व झाडे तोडण्याचे आदेश दिले. त्यावर तिथे उपस्थित असलेला लिला यांचा मुलगा राजू भट यांनी सुद्धा उपस्थित अधिकाऱ्यांना विनंती करीत म्हटले की, तुम्ही झाडाला हात लावाल तर मी आत्महत्या करीन तरी सुध्दा अधिकारी नमले नाही. अखेरीस निरास झालेल्या राजू यांनी सरते शेवटी शेतातील गोठ्यात असलेले कीटकनाशक प्राशन केले होते. ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी लिला यांनी पावर ग्रीड कंपनीचे अधिकारी, तहसीलदार सेलू, सिंदी पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्या विरोधात सिंदी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनवणे, पोलीस निरीक्षक विलास काळे, वनक्षेत्र अधिकारी प्रमोद वाडे, पॉवर ग्रीडचे जनरल मॅनेजर अनिल बासू नाईक , इतर अधिकारी, पीडित भट परिवार यांची पोलीस ठाण्याच्या आवारात बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये पीडित कुटुंबातील लोकांनी घडलेली आपबिती सांगून आम्हाला आमच्या शेतातील झाडांचा योग्य मोबदला द्यावा अशी विनंती केली. त्यामध्ये लिला यांनी टॉवर लाईनच्या खाली येणारे ६१ झाडांची किंमत १६ लाख रुपये मागितले. त्यावर त्यावर उपस्थित पावर ग्रीडचे अधिकाऱ्यांनी १५ डिसेंबर पर्यंत नव्याने सन २०१८ च्या नियमानुसार मूल्यांकन करून परत बैठक घेऊ असे आश्वासन दिले आहे.लिला भट व तिचे तीन मुलं यांचा शेती व्यवसाय असून त्यांची पळसगाव शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतीमध्ये नदीला लागून काही जमिनीमध्ये वडिलोपार्जित १०० वर्षे जुनी सागाची झाडं आहे. भट यांनी आतापर्यंत १० वर्षाच्या फरकाने चार पाच वेळा कायदेशीर प्रक्रिया करून झाडे विकली आहे. त्यामुळे भट यांचे ही झाडे एकप्रकारे दर १० वर्षांनी येणारे नगदी पीक आहे.परंतु पॉवर ग्रीड कंपनी हे दर दोन वर्षांनी झाडे तोडणार असल्याने भट यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यांचे लाखो रुपयाचे पिढ्यान पिढ्या येणारे पीक नाहीसे होणार आहे. त्यामुळे त्यांना संपूर्ण १०० वर्षांचे मूल्यांकन करून मोबदला द्यावा अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आहे.शेतीच्या जमिनीत टॉवर उभारणीशेतीच्या जमिनीवर टॉवर उभारणीचे काम करताना देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे दराने शेतकºयांना आर्थिक मोबदला दिला जातो. तसेच या भागात येणाऱ्या शेतातील झाडांच्या मोबदल्यासाठी वेगळे निकष आहे. परंतु सध्या शेतकऱ्यांना थातूरमातूर मदत दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढत चालला आहे. त्यांची प्रचिती सिंदी रेल्वे नजीकच्या पळसगाव येथील घटनेवरून येत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग