लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : जिल्ह्यातील सर्व गावांच्या आणेवारीची फेरतपासणी करून जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा तसेच प्रशासनाने जाहीर केलेली गावांची ५० टक्क्याच्यावरची पैसेवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.माजी आमदार राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना शनिवारी यासंदर्भात निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुधारीत पैसेवारीचा अहवाल सादर केला आहे. त्यात सर्व गावांची आणेवारी ५१ ते ६० टक्के दाखविली आहे. जिल्ह्यात ६०७ गावांचा समावेश त्यात करण्यात आला आहे. ६१ ते ७० टक्के आणेवारी दाखविलेली ६८६ गावे आहे. ७१ ते ८० टक्के पैसेवारी दाखविलेली गावे ४५ असून ती समुद्रपूर तालुक्यातील आहे. वर्धा जिल्ह्यातील तीन तालुक्यासह १९ मंडळात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. परंतु सरकारने अलीकडे घोषित केलेल्या खरीप पिकाच्या सुधारीत आणेवारी जिल्ह्यातील एकाही गावाची पैसेवारी ५० टक्क्याच्या आत नसल्याचे जाहीर केले आहे. हा दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या भावनांशी मांडलेला खेळ आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार शासनाकडून केला जात आहे. खरीप हंगामात अनेक शेतकºयांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट आले. कापसाचा व सोयाबीनचा उतारा घटला. अशा परिस्थितीत शेतकºयांना दिलासा देण्याऐवजी शासन आणेवारी खोटी दाखवून पळवाटा शोधत असल्याचे या निवेदनात तिमांडे यांनी म्हटले आहे. यात हिंगणघाट तालुक्यात १८७, समुद्रपूर २१९, सेलू १६६, वर्धा १५४, देवळी १४९, आर्वी २०७, आष्टी १३६, कारंजा तालुक्यातील १२० गावांची आणेवारी शासनाला पाठविली आहे.
आणेवारीची फेरतपासणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:22 IST
जिल्ह्यातील सर्व गावांच्या आणेवारीची फेरतपासणी करून जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा तसेच प्रशासनाने जाहीर केलेली गावांची ५० टक्क्याच्यावरची पैसेवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
आणेवारीची फेरतपासणी करा
ठळक मुद्देराष्ट्रवादी कॉँग्रेसची मागणी : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन