शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
2
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
3
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
4
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
5
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
6
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
7
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
8
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
9
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
10
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
11
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
12
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
13
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
14
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
15
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
16
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
17
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
18
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
19
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
20
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!

खेळाडूंनी शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रात प्रतिभा निर्माण करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 11:33 PM

शासनाच्यावतीने खेळाडू विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये अधिक गुणाची सवलत मिळते. तसेच नोकरीत सुद्धा आरक्षण दिल्या जात आहे.

ठळक मुद्देअरविंद टेंभुर्णे : प्रदर्शनी फुटबॉल सामन्यात लोकप्रतिनिधी, अधिकाºयांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाच्यावतीने खेळाडू विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये अधिक गुणाची सवलत मिळते. तसेच नोकरीत सुद्धा आरक्षण दिल्या जात आहे. खेळामुळे विद्यार्थ्यांचा आरोग्यासोबतच शारीरिक विकास होतो. यासाठी खेळाडूंनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात प्रतिभा निर्माण करावी, असे प्रतिपादन जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे यांनी मिशन फुटबॉल पुर्वतयारी कार्यक्रमात केले.महाराष्ट्र मिशन १ मिलीयम अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय या कार्यक्रमाच्या पुर्वतयारीचा आढावा जिल्हा क्रीडा संकुलात घेण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, जिल्हा माहिती कार्यालयाचे दिलीप बोंडसे, क्रीडा प्रशिक्षक डोबाळे व सर्व शाळेतील क्रीडा शिक्षक उपस्थित होते.भारतामध्ये फुटबॉल या खेळाला महत्त्व कमी आहे. जागतिक दर्जाच्या या खेळाला भारतात महत्त्व मिळावे यासाठी प्रथमच विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी एका दिवशी दर्शनी फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यात सर्व खेळाडंूनी सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी टेंभुर्णे यांनी केले.या कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी राज्यासह जिल्ह्यात एकाच दिवशी दर्शनी फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ४०९ शाळा आजच्या फुटबॉल सामन्यात सहभागी होणार आहे. संबंधित शाळांना प्रत्येकी ३ फुटबॉलचे वितरण सुद्धा करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात फुटबॉलचे दर्शनी सामने होणार आहे. तसेच प्रशासनाच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे सुद्धा उद्या सकाळी ८ वाजता दर्शनी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, खेळाडू, शिक्षक सहभागी होणार आहे. यासाठी फुटबॉलची सात मैदान तयार करण्यात आले आहे. सर्व क्रीडा प्रेमींनी फुटबॉल सामन्यात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.