शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

वर्धा नदीच्या पात्रामध्ये वनस्पती व घाण

By admin | Updated: May 27, 2015 01:54 IST

भाजपाची सत्ता आल्यानंतर सर्वप्रथम नदी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. गंगेचे पात्र स्वच्छ करतानाच अन्य नद्यांचे पाणीही निर्मळ होईल,..

प्रशांत हेलोंडे  वर्धाभाजपाची सत्ता आल्यानंतर सर्वप्रथम नदी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. गंगेचे पात्र स्वच्छ करतानाच अन्य नद्यांचे पाणीही निर्मळ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; पण आता ती धुसर होत आहे. वर्धा नदीच्या पात्रात पुलगाव येथे विविध वनस्पती वाढली असून घाणही साचली आहे. यामुळे पिण्यासह शेती, उद्योगांना पाणी पुरविणारी वरदायिनी कधी स्वच्छ होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मध्य प्रदेशातून वाहत येणारी वर्धा नदी अमरावती, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्याकरिता वरदायिनी ठरली आहे. या नदीवर अप्पर वर्धा व निम्न वर्धा अशी दोन धरणे असून पुलगाव येथेही बॅरेज होऊ घातला आहे. पिण्यासह सिंचन व उद्योगांना पाणी पुरवित असतानाच जिल्ह्याला मोठा महसूल मिळवून देण्याचे कामही वर्धा नदीचे पात्र करीत आहे. या नदीवर असलेल्या रेती घाटांतून शासनाला कोट्यवधीचा महसूल मिळतो; पण नदी पात्राकडे पर्यायाने पर्यावरण समतोलाकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नसल्याचेच दिसते. सध्या पुलगाव येथे वर्धा नदीचे पात्र प्रदूषित झाले आहे. निम्न वर्धा प्रकल्प असलेल्या धनोडी, आर्वी तालुक्यात आणि पूढे चंद्रपूरकडे जाणारे पात्रही घाणीच्या विळख्यात अडकले आहे. पुलगाव येथील पात्रात विविध वनस्पतींची वाढ झाली असून घाणही साचली आहे. यामुळे नदीचे पात्रच धोक्यात आले आहे. पुलगाव नगर परिषद तसेच जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत नदी पात्राला जीवन देणे गरजेचे झाले आहे.महसुलाकडे दिले जाते लक्ष; पात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनांचा अभाववर्धा नदीवर जिल्ह्यातील आष्टी, आर्वी आणि देवळी तालुक्यात रेती घाट आहेत. शिवाय अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातही घाट असून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जातो. यातून तीनही जिल्ह्यांना कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो; पण वर्धा नदीच्या पात्राकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नाही. किंबहुना ज्या गावांमध्ये रेती घाट आहेत, त्या गावांच्या विकासाकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. पुलगाव शहराच्या सिमेवरून वाहणारी वर्धा नदी वरदान ठरली आहे; पण या वरदायिनीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. वर्धा नदीचे पात्र अनेक ठिकाणी झाडा-झुडपांसह विविध वनस्पती व घाणीच्या विळख्यात सापडले आहे; पण ते साफ करण्यासाठी कुणीही पुढाकार घेताना दिसत नाही. शिवाय पात्र उथळ झाल्याने पाणी साठत नाही. यामुळे नदीच्या काठावर वसलेल्या अनेक गावांना पुराचा धोका असतो. पावसाळ्यात अनेक गावांना धोक्याचा इशारा दिला जातो; पण पात्र खोलीकरण वा स्वच्छतेकडे कुणी लक्ष देत नाही. काही दिवसांपूर्वी पवनार येथील धाम नदीच्या स्वच्छतेचा फार्स करण्यात आला; पण ते पात्रही साफ झाले नाही. यामुळे तेथेही हीच समस्या भेडसावत आहे. नदी स्वच्छता अभियान राबविले जात असले तरी वर्धा जिल्ह्यातील नद्यांपर्यंत हे अभियान पोहोचलेच नसल्याचे दिसते. यामुळेच नदीचे पात्र धोक्यात आले आहे. पुलगाव येथील वर्धा नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी वनस्पती वाढली असून शेवाळ साचले आहे. काही ठिकाणी निर्माल्यही नदीतच टाकले जाते. नदी पात्राला झुडपांचा वेढा पडला आहे. शासन, प्रशासनाने याकडे लक्ष देत नदी स्वच्छता अभियानाला वेग देणे गरजेचे झाले आहे.