शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत 29,01738 वृक्षरोपांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 05:00 IST

शासनाच्या हरितम्‌, शतकोटी, ३३ कोटी वृक्षलागवड व अन्य योजनांच्या नावाखाली जिल्ह्यात  पावसाळ्याच्या प्रारंभापासून वृक्षलागवड केली जाते. याचे वनविभाग, सामाजिक वनीकरण व अन्य विभागांना उद्दिष्ट दिले जाते. मात्र, कागदावरच अनेक ठिकाणी उद्दिष्टपूर्ती होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लावलेली वृक्षांची सद्यस्थिती काय, संगोपनाची जबाबदारी कुणाची हे प्रश्नही अनुत्तरित आहेत. एकीकडे वृक्षलागवडीचे दावे केले जात असतानाच दुसरीकडे विकासकामांत अडसर ठरत असल्याच्या कारणावरून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडही केली जात आहे. 

ठळक मुद्देजगलीत किती, सद्यस्थिती काय? : संशोधनाचा विषय

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात मागील पाच वर्षांत २९ लाखांवर वृक्षलागवड करण्यात आली.  मात्र, यातील किती वृक्षरोपटी जगलीत, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. दरवर्षी जिल्ह्याला लाखावर वृक्षलागवडीचे उद्दिष्ट होते. मात्र, शासकीय यंत्रणा निम्मेही उद्दिष्ट गाठू शकले नसल्याचे वास्तव आहे. शासनाच्या हरितम्‌, शतकोटी, ३३ कोटी वृक्षलागवड व अन्य योजनांच्या नावाखाली जिल्ह्यात  पावसाळ्याच्या प्रारंभापासून वृक्षलागवड केली जाते. याचे वनविभाग, सामाजिक वनीकरण व अन्य विभागांना उद्दिष्ट दिले जाते. मात्र, कागदावरच अनेक ठिकाणी उद्दिष्टपूर्ती होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लावलेली वृक्षांची सद्यस्थिती काय, संगोपनाची जबाबदारी कुणाची हे प्रश्नही अनुत्तरित आहेत. एकीकडे वृक्षलागवडीचे दावे केले जात असतानाच दुसरीकडे विकासकामांत अडसर ठरत असल्याच्या कारणावरून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडही केली जात आहे. मागील पाच वर्षांत पाच हजारांवर वृक्षांची तोड करण्यात आली. वृक्षलागवडीच्या ८ ते १० टक्के तोडही केली जात असल्याची वास्तविक स्थिती आहे. २०१६ या वर्षात जिल्ह्याला ७ लाख ४० हजार  इतके वृक्षलागवडीचे उद्दिष्ट होते. ४ लाख ९९ हजार २ इतकी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. २०१७ या वर्षात ५ लाख ६४ हजार ८७७, २०१८ या वर्षात २६ लाख ७१ हजार इतके वृक्षलागवडीचे उद्दिष्ट होते. ६ लाख ६० हजार ४३१, २०१९ मध्ये ५७ लाख ६२ हजार २०० इतके उद्दिष्ट होते. १० लाख ५५ हजार ९२९ इतकी वृक्षलागवड झाली. तर चालू वर्षात म्हणजेच २०२० मध्ये १ लाख २१ हजार ४९९ वृक्षरोपांची लागवड करण्यात आल्याचे शासकीय आकडेवारीतून दिसून येते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आल्याचे दावेही केले जात आहेत. मात्र, लावलेल्या या रोपांची आज स्थिती काय, किती जगलीत याची आकडेवारी मात्र, संबंधित विभागाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे या वृक्षलागवडीचे ऑडिट करणार तरी कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग