शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दवाखाना इमारत बांधकामाची नियोजित गैरसोईची जागा बदलली

By admin | Updated: September 2, 2016 02:09 IST

दवाखाना इमारत बांधकामासाठी सर्वदृष्टीने सोईची जागा देण्यास दानदाता विना अट उत्सुक असताना ग्रा.पं. ने बहुमताच्या जोरावर गैरसोईची

वृत्ताची दखल : जुना ठराव केला रद्द, नवीन ठराव मंजूरआकोली : दवाखाना इमारत बांधकामासाठी सर्वदृष्टीने सोईची जागा देण्यास दानदाता विना अट उत्सुक असताना ग्रा.पं. ने बहुमताच्या जोरावर गैरसोईची जागा निवडली होती. तत्सम ठरावही मंजूर केला होता; पण ‘लोकमत’ने वाचा फोडताच अधिकाऱ्यांनीही नियोजित जागा गैरसोईची असल्याचा अभिप्राय दिला. परिणामी, मंगळवारी झालेल्या मासिक सभेत पूर्वीचा ठराव रद्द करून नव्याने सोईच्या जागेवर इमारत बांधकामाचा ठराव घेतला.येथील आयुर्वेदिक दवाखान्याला निधी मंजूर झाल्यानंतर जागेचा शोध घेत असताना अरुण एकनाथराव इंगोले यांनी आपल्या माळेगाव (ठेका ) रोडवरील ऐन मोक्याची ५ हजार स्क्वेअर फुट जागा विनाअट व विनामूल्य देण्याची तयारी दर्शविली होती. विशेष म्हणजे, ही जागा कार्यक्षेत्रातील जामणी, मसाळा, तामसवाडा, आमगाव व मदनी येथील रुग्णांसाठी सोईची होती. दोन टोकावरील जामणी आणि मदनीपासून हे ठिकाण मध्यवर्ती आहे.याउलट ग्रामपंचायतने निवड केलेली जागा भीमराव श्रावण गोमासे यांचे शेत असून ते नाल्याच्या काठावर दलदलीच्या ठिकाणी आहे. शिवाय आकोली बस स्थानकापासून एक किमी अंतरावर आहे. ती ये-जा करण्यासाठी अत्यंत गैरसोईचे होती. मंजूर जागेचे विक्रीपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने करून द्यावे लागते. शेतातील तुकड्यांचे विक्रीपत्र होत नाही. दाणदात्याने देऊ केलेल्या जागेचा एनए झाला आहे. विक्रीपत्र होते. यामुळे ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित केले. यानंतर अनिल दखणे, संजय काकडे व इतरांनी जि.प. अध्यक्ष तथा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती दिली.जि.प. प्रशासनाने जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे विस्तार अधिकारी डॉ. आर.आर. राठोड यांना मोका पाहणीसाठी पाठविले. यात ‘लोकमत’चे वृत्त खरे असल्याचे निष्पन्न झाले. ग्रामपंचायतने व्हीजीट बुकवर तसा अभिप्राय लिहिला. अखेर मंगळवारी झालेल्या मासिक सभेत पूर्वी निवडलेली भीमराव गोमासे यांच्या शेतातील जागा रद्द करून व दाणदाते अरुण इंगोले यांच्या ले-आऊटमधील ५ हजार स्क्वेअर फुट जागेत दवाखाना इमारत बांधकाम करण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यामुळे दवाखान्या इमारतीच्या बांधकामाचा तिढा सुटला आहे. नागरिकांनीही समाधान व्यक्त केले.(वार्ताहर)