शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी जागा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 22:13 IST

आष्टी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी जागा देण्यात यावी या मागणीकरिता युवा स्वाभिमान पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी तळेगाव श्यामजीपंत येथे नागपूर -मुंबई महामार्गावर आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देतळेगाव येथे राष्ट्रीय महामार्गावर रस्तारोको

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्यामजीपंत) : आष्टी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी जागा देण्यात यावी या मागणीकरिता युवा स्वाभिमान पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी तळेगाव श्यामजीपंत येथे नागपूर -मुंबई महामार्गावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अण्णाभाऊ साठे स्मारक समिती, लहुजी शक्ती सेना, मानवहित लोकशाही पक्ष, राष्ट्रीय लहू शक्ती बहुजन रयत परिषद, भिम टायगर सेना आम आदमी पाटी आदींनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी प्रचंड नारेबाजी करण्यात आली.ये आझादी झुठी है देश की जनता भुकी है , अण्णा भाऊ साठे यांचा पुतळ्याच्या जागेचा प्रश्न निकाली निघालाच पाहिजे, आष्टी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या प्रकरणात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही झालीच पाहिजे असे नारे देण्यात आले. या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उळाली व काही काळ महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. मागील ४० वर्षांपासून अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आष्टी येथे वनविभाग कार्यालयाजवळ उभा करण्यात आला आहे. परंतु शासन प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अनेक वर्षापासून अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा खितपत पडलेला आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे सौंदर्र्यीकरण व्हावं यासाठी मातंग समाज संघटना आक्रमक झाल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून या प्रश्नाला निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आंदोलनाच्यावेळी दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष विनय इंगळे, भिम टायगरचे दर्पण टोकसे, बहुजन रयत परिषदेचे दिगंबर सेनेसर, राष्ट्रीय लहू शक्तीचे सुधाकर वाघमारे, मानवहीतचे ईश्वर गायकवाड, रणजित पोटफोडे रामकृष्ण गायकवाड, नितीन तायवाडे आपचे ऋषभ निस्ताने उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाने हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा अन्यथा शासनाविरूध्द तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी विविध संघटनांच्यावतीने देण्यात आला. आंदोलनाच्या वेळी कमलेश चिंधेकर, सिद्धार्थ कळंबे, राहुल विरेकर, संजय कांबळे, नानाभाऊ बोभाटे, अरुण लांडगे, बबन गायकवाड, राहुल प्रधान, गोपाल गिरडकर, मंगेश लांडगे, प्रेम खंडाळकर, अजय गायकवाड, अनिल कांबळे, रमेश राऊत, मंगेश प्रधान, देवरावजी प्रधान, सचिन प्रधान, शेखर तिरडे, आशिष अवचार, प्रभाकर लांडगे, सुधाकर लांडगे, रवींद्र वानखेडे, संजय पोटफोडे, बबलू धानोरकर आदीसह मातंग समाज कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.