शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
3
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
4
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
5
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
6
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
7
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
8
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
9
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
10
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
11
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
12
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
13
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
14
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
15
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
16
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
17
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
19
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
20
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार

पाली भाषेला संघ लोकसेवा आयोगात स्थान द्या

By admin | Updated: February 22, 2016 02:21 IST

पाली ही देशातील महत्त्वाची भाषा आहे. पूर्वी सर्वच साहित्य पाली भाषेत होते; पण संविधान आणि संघ लोकसेवा आयोगातून हीच भाषा वगळण्यात आली आहे. ....

पत्रपरिषद : न्यायालयाच्या आदेशावर अंमल करण्याची मागणीवर्धा : पाली ही देशातील महत्त्वाची भाषा आहे. पूर्वी सर्वच साहित्य पाली भाषेत होते; पण संविधान आणि संघ लोकसेवा आयोगातून हीच भाषा वगळण्यात आली आहे. पाली भाषेला युपीएससीमध्ये पुन्हा स्थान द्यावे. याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशावर सहा महिन्यांत अंमलबजावणी करावी, अशी मागणी नालंदा बुद्ध विहार, तथागत संघ व प्रबुद्ध नागरिक संघाने केली. याबाबत नालंदा बुद्ध विहारात पत्रकार परिषद घेण्यात आली. पाली भाषा १९८१ ते २०१३ पर्यंत संघ लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होती; पण २०१३ मध्ये ती काढून टाकण्यात आली. यामुळे पाली भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. संविधानातही पूर्वी १४ भाषा होत्या. यानंतर २१, ७१ आणि ९२ व्या संशोधनानंतर एकूण २२ भाषांना मान्यता प्रदान करण्यात आली. यात शेजारी हिंदू राष्ट्र असलेल्या नेपाली भाषेला स्थान देण्यात आले; पण पाली भाषेचा विचार करण्यात आलेला नाही. संविधानाचाच आधार घेत संघ लोकसेवा आयोगानेही ही भाषा अभ्यासक्रमातून बाद केली. याबाबत पाली भाषा विभाग प्रमुख डॉ. भालचंद्र खांडेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर १२ फेबु्रवारी २०१६ रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संघ लोकसेवा आयोगाला पाली भाषा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे आदेश दिले. युपीएससीने २०१६ चा अभ्यासक्रम तयार झालेला असल्याने २०१७ च्या सत्रामध्ये पाली भाषेला स्थान देण्याचे मान्य केले. उच्च न्यायालयाने सहा महिन्यांच्या आत आदेशावर अंमल करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय शासनाने पुन्हा एकदा संशोधन करून संविधानात पाली भाषेचा समावेश करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात भाषेचा अंतर्भाव करण्याची तरतूद केली आहे. त्या तरतुदीच्या आधारे पालीला मान्यताप्राप्त भाषेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. याबाबत राष्ट्रपती व पंतप्रधानांना ८०० लोकांच्या सह्यांचे निवेदन पाठविण्यात आले व त्यांचेही उत्तर मिळाल्याचे सांगण्यात आले. पत्र परिषदेला निवृत्त राज्य उत्पादन शुल्क अधिकारी सुधीर भगत, मीरा गोटेकर, नालंदा बुद्ध विहार, तथागत संघ व प्रबुद्ध नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)