शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील ‘तो’ खड्डा अद्याप तसाच

By admin | Updated: April 22, 2017 02:15 IST

गावातील पाणी पुरवठ्याचा व्हॉल्व्ह लिकेज झाल्याने दुरूस्तीकरिता पाईपलाईन खोदण्यात आली.

वाहतुकीचा खोळंबा : पाईपलाईन दुरुस्तीकरिता केले होते खोदकाम रोहणा : गावातील पाणी पुरवठ्याचा व्हॉल्व्ह लिकेज झाल्याने दुरूस्तीकरिता पाईपलाईन खोदण्यात आली. व्हॉल्व्ह दुरूस्त करून महिन्याभराचा कालावधी लोटला. मात्र तरी तो खड्डा बुजविण्यात आला नाही. त्यामुळे वातुकीचा खोळंबा होत असून शुक्रवारी सकाळी नागरिकांनी याचा निषेध नोंदविला. येथील सुभाष वॉर्ड क्रमांक २ मध्ये नळ योजनेचा व्हॉल्व्ह लिकेज होता. त्यामुळे येथील पाणी पुरवठा प्रभावीत झाला. याची दुरुस्ती करण्याकरिता व्हॉल्व्ह उघडण्यात आला. यासाठी खोदकाम केले. त्यानंतर पंधरा दिवस दुरुस्ती केली नाही. त्यामुळे परिसरातील पाणी पुरवठा बंद होता. नागरिकांनी तक्रार केल्यावर लिकेजची दुरुस्ती करण्यात आली. मात्र त्यात पुन्हा बिघाड आला. त्यामुळे ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागला. ग्रामपंचायत प्रशासनाकडे याविषयी वारंवार तक्रार देण्यात आली. त्यानंतर याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. शिवाय खोदकाम करुन ठेवल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली. वाहन चालकांना येथून वाहन घेऊन जाताना अडचणीचा सामना करावा लागला. एकीकडे वाहतुकीची कोंडी आणि दुसरीकडे पाणी असताना टंचाईचा सामना करावा लागल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. तसेच रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेत दोन तासातच व्हॉल्व्ह सुरळीत करण्यात आला. नळाला पाणी येणार असल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला. यानंतरच बंद वाहतूक सुरळीत केली. या सर्व प्रकाराचा ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला.(वार्ताहर) ग्रामस्थांनी नोंदविला निषेध उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले. शिवाय हा काळ लग्नसराईचा असल्याने नागरिकांना वापराकरिता मुबलक पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. लहानसहान दुरुस्तीकरिता विलंब करण्यात येतो. हा प्रकार नागरिकांना वेठीस धरण्याचा आहे, असा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला. ग्रामपंचायत प्रशासनाने तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने निषेध नोंदविण्यात आला.