शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय इमारतीत मद्यशौकीनांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:26 IST

सर्व सेवा ठिकाणी मिळावी असा उद्देश ठेवत तत्कालीन जिल्हाधिकारी चोकलिंगम यांनी वर्धेत प्रशासकीय भवनाची इमारत अस्तित्वात आणली. इमारतीत विविध विभागाची कार्यालये असून कर्मचाऱ्यांकडून ही इमारत मद्य शौकीनांचा अड्डा बनू पाहत आहे.

ठळक मुद्देपरिसरात रिकाम्या बाटल्या : संबंधितांनी लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सर्व सेवा ठिकाणी मिळावी असा उद्देश ठेवत तत्कालीन जिल्हाधिकारी चोकलिंगम यांनी वर्धेत प्रशासकीय भवनाची इमारत अस्तित्वात आणली. इमारतीत विविध विभागाची कार्यालये असून कर्मचाऱ्यांकडून ही इमारत मद्य शौकीनांचा अड्डा बनू पाहत आहे. या इमारतील असलेला दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच या इमारतीत काय उद्योग चालतात याचा परिचय देत आहे.विशेष म्हणजे, याच प्रशासकीय इमारतीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे. असे असताना येथे असा प्रकार सुरू आहे. या इमारतीच्या देखभालीची जबाबदारी उप प्रादेशिक परिवहन विभागाची आहे. आणि याच विभागाचे कर्मचारी या प्रकारात सर्वाधिक असल्याचे बोलले जात आहे. येथील काही अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या आशिर्वादाने काम करणारे दलाल यांच्यात येथे रात्रीला पार्टी रंगत असल्याची चर्चा आहे.या प्रशासकीय इमारतीत सुमारे १५ शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयात काम करणारे कर्मचारी रात्री तर सोडाच भरदिवसाच येथे दारू रिचवित असल्याची अनेक उदाहरणे आहेत. काही वर्षांपूर्वी याच इमारतीतील मत्स्य विभागात झालेल्या पार्टीवर पोलिसांनी कारवाई केली होती. यानंतर इमारतीत सुरू असलेल्या प्रकारावर आळा बसेल असे वाटले होते, मात्र तसे होताना दिसत नाही. येथे दिवसागणिक हा प्रकार वाढत आहे. यामुळे इमारतीची जबाबदारी असलेल्या उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे आहेत.इमारतीत एकूण १५ कार्यालयेया इमारतीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, कामगार न्यायालय, जिल्हा भुमीअभिलेख कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क विभाग यासह सुमारे १५ विविध कार्यालये आहेत. शिवाय याच कार्यालयाच्या परिसरात दारूच्या शिश्या आढळून येत असल्याने जिल्ह्यात दारूबंदीची स्थिती लक्षात आल्याशिवाय राहत नाही. यामुळे या भागात लक्ष देत कारवाई गरजेची आहे.