शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महापुरूषांच्या तत्वज्ञानाचा विसर पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:07 IST

फुले, शाहु, आंबेडकर यांना अपेक्षित असलेल्या जगण्या व्यतिरिक्त आपण जगत आहो. त्यांच्या विचारापासून दूर जात आहे. ज्या फुल्यांनी शेतकºयांच्या बाजूने आसुड उगारला त्या तत्त्वज्ञानाचा आपणाला विसर पडला आहे.

ठळक मुद्देश्रीपाद भालचंद्र जोशी : श्यामसुंदर अग्रवाल स्मृती व्याख्यानमाला कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : फुले, शाहु, आंबेडकर यांना अपेक्षित असलेल्या जगण्या व्यतिरिक्त आपण जगत आहो. त्यांच्या विचारापासून दूर जात आहे. ज्या फुल्यांनी शेतकºयांच्या बाजूने आसुड उगारला त्या तत्त्वज्ञानाचा आपणाला विसर पडला आहे. कालपर्यंत भारत हा नायक होता. जगाला विचार देणारा देश म्हणून याकडे पाहिले जात होते;पण आज तो विचार पूर्णत: मेला आहे. एका झेंड्याच्या प्रक्रियेमुळे हा विचार नष्ट होवू पाहत आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले.स्थानिक श्यामसुंदर अग्रवाल स्मृती व्याख्यानमालेत ते ‘आपल्या भोवतालचे जग’ या विषयावर मार्गदर्शन६ करताना बोलत होते. अग्रवाल धर्मशाळेत आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रदीप दाते, डॉ. विलास देशपांडे व संजय इंगळे तिगावकर यांची उपस्थिती होती.डॉ. श्रीपाद जोशी पुढे म्हणाले, ईश्वराची तादात्तय, परमात्मा, देव या सर्व आपण तयार केलेल्या कल्पना आहेत. दिवसेंदिवस अध्यात्माचे बाजारीकरण होत आहे. यातूनच अंधश्रद्धेला खतपाणी मिळत आहे. तर्काने व बुद्धीने विचार करण्याची तयारी नसल्याने तसेच वैचारिक व सांस्कृतिक जडणघडणाअभावी हे सर्व घडत आहे. ग्रामीण भागाने संस्कृतीचे जतन केले;पण शहरीकरणामुळे तेही नासत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गत ३४ वर्षांपासून लोकशिक्षणाचे कार्य या व्याख्यानमालेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. श्यामसुंदर अग्रवाल याचा सामाजिक वारसा पुढे रेटण्यासाठी प्रयत्न होत आहे. विचार आणि विवेकाच्या आधारावर समस्त समाज व्यवस्थेत बदल होणे अपेक्षित आहे, असे विचार खासदार तडस यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी शहरातून प्रथम आलेल्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात ऋतुका राजेंद्र भोयर व स्रेहा आनंद लाडेकर यांचा समावेश होता. जनता हायस्कूलच्या उपमुख्याध्यापका वनिता मदनकर यांनी कार्याचा आढावा घेतला. प्रास्ताविक प्राचार्य राहुल चोपडा यांनी केले. संचालन महेश अग्रवाल यांनी केले तर आभार मोहनलाल अग्रवाल यांनी मानले. कार्यक्रमाला प्रकाश चंद्र कांकरीया, दाऊदास टावरी, न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, हाजी अब्दुल हमीद, शरद नाईक महाराज, पुरूषोत्तम टावरी, मधु अग्रवाल, सुरजमल जैन, नगरसेवक नंदू वैद्य, हरिष ओझा, श्याम बासू, दिपक अग्रवाल, सोपान लोखंडे, नरेश अग्रवाल आदींची उपस्थिती होती.