शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

क्वारंटाईन असलेली व्यक्ती निघाली कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क देवळी/पुलगाव : देवळी येथील औद्योगिक वसाहतीतील कोविड केअर सेंटरमध्ये संस्थात्मक विलगीकरणात असलेला व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ...

ठळक मुद्देदेवळी-पुलगावात खळबळ : मुलूंड येथून परतला कारने

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी/पुलगाव : देवळी येथील औद्योगिक वसाहतीतील कोविड केअर सेंटरमध्ये संस्थात्मक विलगीकरणात असलेला व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर व्यक्ती पुलगाव येथील रहिवासी असल्याने पुलगावातील काही भाग सील करण्यात आला आहे. शिवाय तो परिसर निर्जंतूक केला जात आहे.पुलगाव येथील रहिवासी असलेला व्यक्ती मुंबई (मुलूंड) येथे एल अ‍ॅण्ड टी कंपनीत कामाला होता. मुंबईत वाढते कोरोना संकट आणि घराची ओढ यामुळे तो १४ जून रोजी पुलगाव येथे परतला. त्यानंतर त्याला व त्याच्या सोबतच्या तिघांना खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य व महसूल विभागाने देवळीच्या औद्योगिक वसाहतीतील कोविड केअर सेंटरमध्ये संस्थात्मक विलगीकरणासाठी ठेवले. याच दरम्यान त्याच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यानंतर सदर व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.ब्रह्मपुरीचा एक कोविड पॉझिटिव्ह आल्यावर घेतले नमुनेमुंबई येथून निघालेल्या दुसऱ्या वाहनात वर्धेतील एक तर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील दोघे व्यक्ती होते. यापैकी ब्रह्मपुरी येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर देवळीत संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या चौघांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले.त्याचा अहवाल सोमवारी रात्री उशीरा प्राप्त झाला. या अहवालानुसार पुलगावचा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. तर उर्वरित तिघे कोरोना निगेटिव्ह आहेत.परिसर केला जातोय निर्जंतुककोविड बाधित आढल्याची माहिती मिळताच आरोग्य व पोलीस प्रशासनाने रात्रभर मोहीम राबवून २३ जणांना क्वारंटाईन केले. या क्वारंटाईन केलेल्यापैकी नऊ व्यक्ती कोविड बाधिताच्या निकट संपर्कात आल्याची नोंद घेत त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर खबरदारीचा उपाय म्हणून पुलगाव शहरातील सुभाषनगर, बरांडा हा परिसर सील करून पुलगाव न.प.च्यावतीने परिसर निर्जंतुक केला जात आहे. हायरिस्कमधील व्यक्तीचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आहे.सात व्यक्ती दोन कारने परतले मुंबईहूनतहसीलदार राजेश सरवदे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण धमाने यांनी सांगितले की, कोरोना बाधित निघालेल्या व्यक्तीसह एकूण सात जण दोन वेगवेगळ्या कारने मुंबई येथून निघाले होते. या दोन वाहनापैकी एका वाहनात पुलगावचा हा इसम आणि इंझाळा येथील तीन व्यक्ती होते. खबरदारीचा उपाय म्हणून या व्यक्तींना देवळीत संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले. या कोविड बाधिताच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींना सध्या शोध घेतला जात असल्याचेही सांगण्यात आले.

नागरिकांनी घाबरून जावू नये. तसेच अफवावर विश्वास ठेऊ नये. खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक व्यक्तीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. कोरोनाबाधिताच्या निकट संर्पकात आलेल्यांचा शोध घेतल्या जात आहे.- डॉ. गोपाल नारलवार, वैद्यकीय अधीक्षक, पुलगाव.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या