शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकांची कामे जलदगतीने करा

By admin | Updated: July 9, 2015 02:15 IST

शहरातील सामान्यांना शिधापत्रिकांसाठी कित्येक महिने चकरा माराव्या लागत आहे.

दलाल हटवा : आम आदमी पार्टीची तक्रारहिंगणघाट : शहरातील सामान्यांना शिधापत्रिकांसाठी कित्येक महिने चकरा माराव्या लागत आहे. उलट दलालामार्फत गेल्यास हेच काम जलद होते, अशी तक्रार आम आदमी पक्षाने केली आहे. ही व्यवस्था दलालरहित करावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनातून केली आहे.तहसील कार्यालयात दलालांचा शिरकाव झाल्याने व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहे. नवीन शिधापत्रिका बनविण्यासाठी वा नाव कमी-अधिक करण्यासाठी अनेकदा चकरा माराव्या लागतात. याबाबतच्या तक्रारी लक्षात घेत सामान्यांची कामे वेळेत व्हावीे, यासाठी आम आदमी पक्षाने पुढाकार घेऊन येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले. सामान्यांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी केरोसीन गरजेचे असते. सध्या पावसाळा असल्याने केरोसीनची गरज आणखी वाढते. जीवनावश्यक रॉकेल शासनमान्य विक्रेत्याकडून रेशनकार्डवर मिळते. यासाठी नागरिकांना रेशनकार्ड मिळणे गरजेचे आहे. शिधापत्रिका बनविण्यासाठी पुरवठा विभागात पाच-दहा चकरा माराव्या लागतात. शेवटी कंटाळून नागरिक दलालामार्फत जातात आणि तेव्ही जलद काम होते, हा अनुभव आहे. शासकीय नियमावलीनुसार रेशनकार्डसाठी अर्ज दिल्यानंतर सहा दिवसांत कार्ड मिळायला पाहिजे; पण तसे होत नाही. पुरवठा विभागात शिल्लक १०० ते १५० अर्जांवर त्वरित कारवाई करून निकाली काढावी व तेथील व्यवस्था अधिक सक्षम करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.राजीव गांधी जीवनदायी योजनेत राशनकार्ड आवश्यक केल्याने गरजू रुग्णांचा जीव वाचविण्यासाठीही त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, असेही निवेदनात नमूद आहे. निवेदन देताना मनोज रूपारेल प्रमोद जुमडे, अखिल धाबर्डे, संदेश थुल, सलमान रंगरेज, नरेंद्र चुंबडे, नरेंद्र पांढरे, राजू अरगले, मेंढे, अजय देवढे, भारत पवार व पदाधिकारी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)