शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पुलगाव-आर्वी-वरूड-आमला रेल्वे मिशनकरिता जनआंदोलन

By admin | Updated: August 10, 2016 00:33 IST

पुलगावपासून आर्वीपर्यंत ३५ कि़मी. नॅरोगेज रेल्वे असून आर्वी ते वरूड ६० कि.मी. जोडल्यास संपूर्ण परिसरातील....

शहीदभूमीत रणनिती ठरविण्यासाठी पार पडली सभा आष्टी (शहीद): पुलगावपासून आर्वीपर्यंत ३५ कि़मी. नॅरोगेज रेल्वे असून आर्वी ते वरूड ६० कि.मी. जोडल्यास संपूर्ण परिसरातील जवळपास १० लाख जनतेच्या अर्थव्यवस्था व राहणीमानावर चांगला परिणाम होईल. तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यास मदत होणार असल्याचे म्हणत पुलगाव-आर्वी-वरूड-आमला १०० कि़मी. रेल्वे मिशन म्हणून येत्या स्वातंत्र्यदिनापासून शहीद भूमीतून हे जनआंदोलन उभारणार असल्याची माहिती येथील शहीद स्मारकात आयोजित सभेत उपस्थित मान्यवरांनी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मीरा येणुरकर, रेल्वे मिशनचे प्रा. प्रशांत सव्वालाखे, डॉ. रिपल राणे, साखरे, बाबाराव डाहाके, नगरपंचायत बांधकाम सभापती जयश्री मोकद्दम यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी अतिथींनी सविस्तर मार्गदर्शन केले. ब्रिटीशांनी १९१६ ला आर्वी परिसरातील कापूस व लोणी इंग्लडच्या मँचेस्टर येथे पाठविण्यासाठी रेल्वे सुरू केली होती. मग ती बंद का करण्यात आली, असा सवालही यावेळी करण्यात आला. यासाठी गावापासून दिल्लीपर्यंत लढा देण्याची गरज व्यक्त केली. भरत वणझारा यांनी भूमिका मांडताना सांगितले की, यवतमाळला माजी खासदार विजय दर्डा यांच्या अथक परिश्रमातून यवतमाळ रेल्वे मार्गाचा प्रश्न सुटला. तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव हे रामटेकचे खासदार होते म्हणून नरखेड रेल्वेलाईन झाली. याच धर्तीवर खा. रामदास तडस यांनी या रेल्वे मार्गाकरिता संसदेमध्ये आवाज उठविला आहे. त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी जलआंदोलनात सर्वपक्षीय पुढकाराची गरज आहे. त्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी अशोक विजयकर, कमलाकर निंभोरकर, डॉ. राजेंद्र निखरा यांनी नियोजन संबंधी मार्गदर्शन केले. गौरव जाजू, डॉ. रिपल राणे यांनी पुलगाव-आर्वी-वरूड-आमला रेल्वे जनआंदोलन संविधानिक शांततामय वातावरणात करण्याबाबत भूमिका मांडली. सभेचे आयोजन अ‍ॅड. मनीष ठोंबरे, आवेश खान, निरज भार्गव यांनी केले होते. संचालन सुरेश काळपांडे यांनी केले तर आभार ठोंबरे यांनी मानले. यावेळी शहरातील नागरिक उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)