शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कामे प्रलंबितच, देयके मात्र ‘क्लियर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 01:03 IST

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून केंद्र व राज्य शासनाने पॅकेजच्या विहिरी दिल्या. वीज पुरवठ्याची सोय करून दिली; पण ही मोहीम राबविणारी यंत्रणाच भ्रष्ट असल्याने योजनेवर प्रश्नचिन्ह लागले.

ठळक मुद्देकृषीपंपाच्या वीज जोडणीतील प्रकार : जिल्ह्यातील ३ हजार ४०० शेतकरी प्रतीक्षेत

प्रशांत हेलोंडे।ऑनलाईन लोकमत वर्धा : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून केंद्र व राज्य शासनाने पॅकेजच्या विहिरी दिल्या. वीज पुरवठ्याची सोय करून दिली; पण ही मोहीम राबविणारी यंत्रणाच भ्रष्ट असल्याने योजनेवर प्रश्नचिन्ह लागले. जिल्ह्यातील ३४०० शेतकरी आजही वीज जोडणीची प्रतीक्षा करीत आहे; पण यातील कंत्राटदारांची देयके मात्र कामे होण्यापूर्वीच ‘क्लियर’ केलीत.वीज जोडणी न मिळाल्याने शेतकरी कार्यालयात चकरा मारून थकले; पण वास्तव काही औरच आहे. वीज पुरवठ्याची जोडणी होण्यापूर्वीच लाखो रुपयांची देयके अदा केलीत. या प्रकरणी राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जिल्ह्यातील शेतकºयांनी तक्रारी केल्या आहेत.महावितरण अधीक्षक अभियंता वर्धा कार्यालयांतर्गत कार्यकारी अभियंता वर्धा, हिंगणघाट, आर्वी असे तीन विभाग आहे. या विभागांनाही अधीक्षक अभियंत्यांनी स्वत:च्या मर्जीतील एजेंसी नेमून त्यांना कामे दिली आहे. ही कामे कुठे सुरू झाली तर काही ठिकाणी सुरूवातही झाली नाही; पण अ‍ॅडव्हान्स देयके अदा करण्यात आली आहेत. शेतकºयांच्या हक्काची ही योजना भ्रष्टाचाराच्या मार्गात अडकल्याने जिल्ह्यातील ३४०० शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. वारंवार मागणी करूनही सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.सध्या रबी हंमाग सुरू झाला आहे. विहिरीवरून शेतातील सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी वीज जोडणी गरजेची आहे. त्यांना त्वरित जोडणी देण्याची गरज आहे. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात वीज जोडणीची कामे करण्यात आलीत; पण २०१७-१८ या वर्षात कुठेही वीज जोडणीची कामे झाली नाहीत. याबाबत वीज वितरण कंपनीला विचारणा केली असता एप्रिल २०१८ पासून आजपर्यंत निधीच आला नाही. मागील वर्षीच्या निधीतूनच कामे केली जात आहेत. यामुळे गतवर्षी काढलेली अ‍ॅडव्हान्स बिले आतापर्यंत पुरली काय, कामे झाली तर त्याचे आॅडीट गेले कुठे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नांची उत्तरे अधिकाºयांकडेही नसल्याने ते टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले. वीज जोडणी देण्यापूर्वीच कंत्राटदारांची देयके अदा करण्यात आली आहेत. यामुळे महावितरणच्या कार्यावरच संशय निर्माण होत असून चौकशी गरजेची आहे.शासनाची दिशाभूलकृषीपंप जोडणीच्या कामासाठी शासनाने मागील वर्षी निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून अधिकाºयांनी अ‍ॅडव्हॉन्स काढून ठेवला आहे. काहींची बिले दिलीत. आता नेमलेल्या एजेंसी काम करण्यास टाळाटाळ करीत आहे. शेतकरी मात्र न्यायासाठी भटकंती करीत आहे. मागील वर्षीचा निधी पूर्ण खर्च झाला, असे दाखवून शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.अभियंत्याचा प्रतापकृषीपंप जोडणीच्या कामांची देयके आर्वी येथील उपकार्यकारी अभियंता देशमुख यांनी मर्जीतील कंत्राटदारांना अ‍ॅडव्हान्समध्ये अदा केली. देशमुख यांनी जोडणीपूर्वीच देयके अदा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य कार्यवाही करणे तथा उर्वरित वीज जोडण्या त्वरित देण्याची गरज निर्माण झाली आहे.कृषी पंप जोडणीच्या कामासाठी मागील वर्षी प्राप्त झालेला निधी खर्च करणे सुरू आहे. यावर्षी कुठलाही निधी आलेला नाही. ‘अ‍ॅडव्हान्स’ देयके देणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्यात येईल.- सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता, वीज वितरण कंपनी, वर्धा.