शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर कांदे विक्रेत्यांना नियम डावलून दंड

By admin | Updated: May 24, 2017 00:45 IST

शहरात रस्त्यावर जागा मिळेल तिथे कांदे विकणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहेत. यात कोण व्यापारी व कोण शेतकरी

वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रताप : गवगवा होताच दंडाची रक्कम केली परत लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरात रस्त्यावर जागा मिळेल तिथे कांदे विकणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहेत. यात कोण व्यापारी व कोण शेतकरी हा मुद्दा गौण असला तरी यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याची ओरड झाली. यामुळे बाजार समितीच्या एका कर्मचाऱ्याने कुठलीही चौकशी न करता नियमांना डावलून रस्त्यावर कांदे विकणाऱ्यांना थेट दंड ठोठावला. या प्रकरणाचा गवगवा होताच बाजार समितीच्यावतीने झालेल्या प्रकारावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न करीत दंड केलेल्यांना त्यांची रक्कम परत केली. वर्धा शहरातच नाही तर जिल्ह्यातील इतर भागातही रस्त्यावर गाडी उभी करून कांदे विकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. हे विक्रेते शेतकरी आहेत अथवा व्यापारी याची कुठलीही शहानाशी होत नाही. त्यांच्याकडून अत्यल्प दरात कांदा मिळत असल्याने नागरिकांकडून त्याची खरेदी होत आहे. याचा त्रास बाजार समितीतील काही व्यापाऱ्यांना झाल्याने त्यांनी बाजार समितीत जात ओरड केली. यावर कुठलीही चौकशी न करता एका कर्मचाऱ्याने थेट कांदा विक्रीचे ठिकाण गाठत विक्री करणाऱ्यांना दंडा ठोठावला. याची माहिती बाजार समितीच्या सचिवांना कळताच त्यांनी हा प्रकार नियमाला डावलून असल्याचे म्हणताच सदर कर्मचारी बाजार समितीत परत आला. त्याने दंड ठोठावलेल्या कांदा विक्रेत्यांकडून घेतलेली रक्कम त्यांना परत केली. आतापर्यंत दोन विक्रेते दंडाची रक्कम परत घेवून गेल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली आहे. दंडाची रक्कम परत करण्यात आली असली तरी झालेला प्रकार हा चिंताजनकच असल्याची ओरड होत आहे. याकडे बाजार समितीच्या सभापतींनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. दोघांना केली रक्कम परत बाजार समितीच्या कर्मचाऱ्याकडून केलेल्या दंडाची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला. यानुसार दोघांनी बाजार समितीशी संपर्क साधात दंडाची रक्कम परत घेतली. या दोघांकडे सातबारा आणि पेरीपत्रक असल्याने ते शेतकरी असल्याचे समोर आहे. शेतकऱ्यांकडून त्याचे उत्पादन त्याच्या मर्जीच्या दराने विकल्या जात असल्याने व्यापाऱ्यांत चांगलीच खळबळ माजल्याचे दिसून येत आहे. यातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. झालेला प्रकार कानावर आला. प्रारंभी याची कल्पना असती तर वेळीच यावर प्रतिबंध लावण्यात आला असता. मात्र प्रकार घडल्यावर माहिती मिळाल्याने दंड म्हणून वसूल केलेली रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला. दंडासंबंधीची माहिती सचिवांना अधिक आहे. - श्याम कार्लेकर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा नियमानुसार बाजारात कुठेही भाजी विक्री करणाऱ्यांना दंड करण्याचा अधिकार बाजार समितीला नाही. मात्र कर्मचाऱ्यांच्या हातून ही चूक घडली. विक्री करणारा शेतकरी अथवा व्यापारी याचा निर्णय उपनिबंधक कार्यालय ठरवेल. येथे घडलेल्या चुकीअंती केलेला दंड परत देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत दोघांनी बाजार समितीतून रक्कम परत नेली आहे. - समीर पेंडके, सचिव, कृउबा समिती वर्धा