शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

व्हीआयपी मार्गावर खड्डेचखड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:41 IST

शहरातील व्हीआयपी मार्गाची सध्या दैनावस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले असून ते रात्रीच्या सुमारास सहन दिसत नसल्याने मोठ्या अपघाताची भीती बळावली आहे.

ठळक मुद्देमोठ्या अपघाताची भीती : वाहनचालकांसह नागरिकांना नाहक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील व्हीआयपी मार्गाची सध्या दैनावस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले असून ते रात्रीच्या सुमारास सहन दिसत नसल्याने मोठ्या अपघाताची भीती बळावली आहे. त्याच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी आहे.सिव्हील लाईन भागातील जिल्हाधिकाºयांच्या बंगल्यापासून वर्धा-नागपूर मार्गावरील गोपुरी चौक पर्यंतच्या रस्त्याला व्हीआयपी मार्ग अशी ओळख आहे. परंतु, सध्या याच मार्गावर ठिकठिकाणी मोठ-मोठाले खड्डे पडले आहेत. या मार्गाने प्रवास करणाºयांना तारेवरची कसरतच करीत नियोजित ठिकाणी पोहोचावे लागत आहे. सदर मार्गावरील पथदिवे रात्रीच्या सुमारास बंद राहत असल्याने रस्त्यावरील खड्डे वाहनचालकांना सहज दिसत नाही. इतरकेच नव्हे तर रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचते. त्यामुळे खड्डा किती खोल आहे याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. खड्डा चुकविण्याच्या नादात अनेक अपघातात झाले असून अनेकांना कायमचे अपंगत्त्व आल्याचे वास्तव आहेत. तर अनेकांना प्राणही गमवावा लागला. या मार्गावरील प्रवास धोक्याचा ठरत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी संभाव्य धोका लक्षात घेता सदर मार्गाच्या दुरूस्तीची काम तात्काळ हाती घेण्याची मागणी आहे.