शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात शांततेत मतदान, एका गावाचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 11:14 IST

Wardha News वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीकरिता मतदान प्रक्रिया पार पडली.

ठळक मुद्दे कारंजा तालुक्यातील खैरेवासीयांनी प्रशासनाप्रति रोष व्यक्त करुन मतदानाचा हक्क न बजावता दिवसभर अन्नत्याग केला. पुनर्वसित असलेल्या या गावात वीस वर्षांपासून कोणत्याही सुविधा नसल्याने गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. कारंजा येथील तहसीलदार सचिन कुमा

३.३० वाजतापर्यंत ६१.१३ टक्के मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा: जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीकरिता मतदान प्रक्रिया पार पडली. कोरोनाच्या उपाययोजना राबवून मतदारांना यावर्षी मास्क लावूनच मतदानाचा हक्क बजवावा लागला. वर्धा, सेलू, देवळी या तालुक्यातील प्रत्येकी तीन, आर्वी तालुक्यातील सात, आष्टी तालुक्यातील चार, कारंजा तालुक्यातील ८, हिंगणघाट तालुक्यातील ५ तर समुद्रपूर तालुक्यातील १७ अशा एकूण ५० ग्रामपंचायतीमधील १७३ प्रभागातील ४७२ सदस्यांकरिता एकूण १ हजार २७९ उमेदवार रिंगणात आहे. या सर्व ग्रामपंचायतीमध्ये ५७ हजार १०९ महिला तर ६० हजार ८५७ पुरुष असे एकूण १ लाख १७ हजार ९६६ मतदारांकरिता २०६ मतदान केंद्रावरुन मतदान घेण्यात आले. दुपारी ३.३० वाजतापर्यंत ६१.१३ टक्के मतदान पार पडले. शेवटची टक्केवारी उपलब्ध व्हायला विलंब झाला. पण, ही टक्केवारी ७० टक्केपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असून आष्टी तालुक्यातील तळेगाव (श्याम.पंत) येथे मतदार यादीतील घोळामध्ये नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता. तसेच कारंजा तालुक्यातील खैरेवासीयांनी प्रशासनाप्रति रोष व्यक्त करुन मतदानाचा हक्क न बजावता दिवसभर अन्नत्याग केला. पुनर्वसित असलेल्या या गावात वीस वर्षांपासून कोणत्याही सुविधा नसल्याने गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. कारंजा येथील तहसीलदार सचिन कुमावत यांनी नागरिकांना समाजाविण्याचा प्रयत्न केला तरीही नागरिक आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

 

टॅग्स :Electionनिवडणूक