शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता तातडीने अदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता तातडीने अदा करण्यात यावा यासह एकूण नऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता तातडीने अदा करण्यात यावा यासह एकूण नऊ मागण्यांसाठी पालिका कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेत बुधवारी पालिका कार्यालयासमोर ठिय्या दिला. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे मुख्य संघटक दीपक रोडे यांनी केले.नगरपरिषदेच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता तत्काळ अदा करण्यात यावा. संपूर्ण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संपूर्ण देयता तत्काळ अदा करावी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या हप्त्याची शिल्लक राहिलेली रक्कम तातडीने अदा करण्यात यावी.१२ आणि  २४ वर्ष झाल्यानंतर देण्यात आलेल्या आश्वासित प्रगती योजनेची थकबाकी अदा करण्यात यावी. ज्येष्ठ लिपिकाचे रिक्त पदे तत्काळ पदोन्नतीने भरण्यात यावी. कनिष्ठ लिपिकाचे रिक्त पदे वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यात यावी. सफाई कर्मचाऱ्यांचे हजेरी दिवस महिन्याचे एक तारखेला देण्यात यावी ; जेणेकरून कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होईल. सफाई कर्मचाऱ्यांना मागील पाच वर्षांपासून न दिलेला गणवेश आणि गमबुट देण्यात यावा. सफाई कर्मचाऱ्यांना श्रम साफल्य योजनेमधून तातडीने पक्के घर बांधून देण्यात यावी आदी मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या. आंदोलनात मोठ्या संख्येने पालिका कर्मचारी सहभागी झाले होते.

कामकाजावर पडला परिणाम-    कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे बुधवारी नगरपालिकामधील विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे बुधवारी पालिकेच्या कामकाजावर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा विपरित परिणाम पडला. 

 

टॅग्स :7th Pay Commissionसातवा वेतन आयोग