शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

शिक्षकांना शासनाच्या नियमानुसार वेतन द्या

By admin | Updated: July 10, 2017 00:54 IST

सी.बी.एस.ई. कॉन्व्हेंट मधील शिक्षकांकडून अतिशय अल्प वेतनावर कामे करून घेतली जात आहेत.

अजय भोयर यांची माहिती : शिक्षण उपसंचालकांचे आदेशलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सी.बी.एस.ई. कॉन्व्हेंट मधील शिक्षकांकडून अतिशय अल्प वेतनावर कामे करून घेतली जात आहेत. अशा शिक्षकांच्या बँक खात्यात राज्य शासनाच्या नियमानुसार वेतन जमा करावे, त्यांना रोख स्वरूपात वेतन देऊ नये, असे आदेश नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिल्याची माहिती प्रा. अजय भोयर यांनी दिली आहे.राज्यातील बरेच सी.बी.एस.ई. व स्टेट च्या कॉन्व्हेंट शाळा राज्य शासनाच्या नियमांना फाटा देतात. त्यामुळे शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे होत असलेले शोषण लक्षात घेता नागपूर विभागाचे शिक्षक आ. नागो गाणार यांनी या इंग्रजी शाळांना सुद्धा मराठी शाळाप्रमाणे नियमावली असावी व त्याचे पालन होत नसल्यास शाळेची मान्यता काढावी अशी मागणी केली. त्यानुसार शिक्षण उपसंचालक यांनी इंग्रजी शाळांना बारा मुद्द्यांचे पालन करण्याचे आदेश नुकतेच दिले. त्यात नियमानुसार वेतनाशिवाय प्रामुख्याने खासगी प्रकाशनाचे कोणतेही पुस्तक विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी न देता फक्त एन.सी.ई.आर.टी.कडून प्रकाशित झालेले पुस्तके विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अनिवार्य करावे. शाळेतून, वह्या-पुस्तके, शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याबाबत आग्रह करू नये. पालक-शिक्षक संघानी सर्वानुमते निश्चित केलेले शिक्षण शुल्क, मासिक शुल्क आकारण्यात यावे, शुल्क रोख स्वरूपात न स्विकारता धनादेश, धनाकर्ष, आॅनलाईन बँकींग मार्फत स्विकारावे. शाळेत पात्र मुख्याध्यापक व शिक्षकांची नियुक्ती करुन शिक्षणाधिकाऱ्याकडून मान्यता घ्यावी. कोणतीही देणगी पालकाकडून घेवू नये. आर.टी.ई. कायद्यातील तरतुदीनुसार सर्व शाळांनी आर.टी.ई. खाते मान्यता घ्यावी आदि मुद्दयांचे पालन न झाल्यास शाळेची राज्यशासनाची दिलेली मान्यता व राज्यशासनाने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याची कार्यवाही करण्याची तंबी सुद्धा शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या आदेशात दिल्याची माहिती अजय भोयर यांनी दिली. या आदेशामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांची पिळवणूक थांबणार आहे.