शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ठेवीदारांना निर्धारित व्याजदर द्या

By admin | Updated: September 10, 2016 00:37 IST

वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेचा परवाना मिळाल्यानंतर जिल्ह्यातील मुदती ठेवीदारांना ठेवी परत मिळतील, अशी आशा होती.

सहकारी बँकेतील प्रकार : महात्मा फुले समता परिषदेची मागणीवर्धा : वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेचा परवाना मिळाल्यानंतर जिल्ह्यातील मुदती ठेवीदारांना ठेवी परत मिळतील, अशी आशा होती. २०१३ पासून ठेवीदारांना रक्कम देण्यात आली नाही. आता ठेवीदारांना ४ टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे ठेवीदारांत असंतोष असून निर्धारित व्याजदर मिळावे, अशी मागणी म. फुले समता परिषदेने केली. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना निवेदन देण्यात आले.ठेवीदारांच्या मुदत ठेवींवर बँकेने निर्धारित व्याजाप्रमाणे व्याज देण्यात यावे. बँक व ठेवीदार याबाबत करार बंधनकारक करण्यात आला, असे समजते. बँकेत असलेल्या ठेवीवरील ८.५ टक्के मिळणारे व्याज कमी करून ४ टक्के देण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब अन्यायकारक आहे. ठेवीदार गप्प बसणार नाही. नेमलेल्या त्रिसदस्य समितीच्या अध्यक्षांनी ठेवीदारांच्या हिताचे निर्णय घ्यावे. जिल्हाधिकारी यांच्या निर्णयामुळे ठेवीदारांचे नुकसान होणार आहे. पूर्वीच्या बँक संचालक मंडळाकडे असलेले कर्ज वसूल करून ठेवी परत कराव्या. कर्मचाऱ्यांनी २०१३ पासून वेतन घेतले; पण ठेवीदारांना एकही पैसा मिळाला नाही. वसुलीतून ५ हजार रुपये दरमहा कर्मचाऱ्यांच्या वेतनासोबत ठेवीदारांना द्यावे. खातेदार बँकेत गेल्यास शेतकरी कर्ज वसुली देत नाही, असे सांगितले जाते. मग, वेतनासाठी पैसा येतो कुठून. या बाबींचा गांभीर्याने विचार करून निर्धारित व्याजदर द्यावा, अशी मागणी परिषदेने केली. यावेळी जिल्हा संघटक विनय डहाके, भरत चौधरी निळकंठ राऊत, सुधीर पांगुळ, सुनील दुबे, श्याम जगताप, जयवंत भालेराव, मनोज भांडेकर, अनिल बाळसराफ उपस्थित होेते.(कार्यालय प्रतिनिधी)