शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

पवनारसह वरूडचा होणार कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 23:46 IST

सेवाग्राम व पवनार या दोन ऐतिहासिक गावांना जोडणाऱ्या वरूड आणि पवनार या दोन गावाचा कायापालट होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत १७ कोटींचा निधी देण्याच्या विषयाला शिखर समितीच्या बैठकीत अंतीम मंजुरी दिली असल्याची माहिती आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिली आहे.

ठळक मुद्देपंकज भोयर : १७ कोटींचा निधी मंजूर, विविध विकास कामे मार्गी लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम व पवनार या दोन ऐतिहासिक गावांना जोडणाऱ्या वरूड आणि पवनार या दोन गावाचा कायापालट होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत १७ कोटींचा निधी देण्याच्या विषयाला शिखर समितीच्या बैठकीत अंतीम मंजुरी दिली असल्याची माहिती आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिली आहे. त्यासाठी आपण पाठपुरावा केल्याचेही आ. भोयर यांचे म्हणणे आहे.वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना १ जाने २०१७ ला पत्र देवून पवनार व वरूड गावाच्या अंतर्गत पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी दोन्ही गावांसाठी प्रत्येकी १० कोटी रूपयांचा निधी देण्याची मागणी आ. भोयर यांनी केली होती. त्यावर वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी त्वरित अप्पर मुख्य सचिव (नियोजन) यांना निधी उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने १६ जानेवारी २०१७ ला नियोजन विभागाचे अप्पर सचिव य. अ. पिंपळे यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून या संबंधी आराखडा पाठविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी २४ मार्च २०१७ व २० जून २०१७ ला सविस्तर आराखडा नियोजन विभागाकडे पाठविला. ४ सप्टेंबर २०१७ ला उच्चाधिकारी समितीच्या बैठक पार पडली. या बैठकीत सदर दोन्ही गावातील पायाभूत कामांसाठी १९.८८ कोटी रूपयांच्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. समितीने हा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया शिखर समिती समोर अंतीम मान्यतेसाठी ठेवला. २४ आॅगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडलेल्या शिखर समितीच्या बैठकीत हा विषय चर्चीला गेला. त्यावेळी खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख सचिव प्रवीण परदेशी, अप्पर मुख्य सचिव (वित्त विभाग), प्रधान सचिव, जलसंदपदा विभाग, पोलीस महासंचालक महाराष्ट्र विभागीय आयुक्त नागपूर व जिल्हाधिकारी शैलेश नवाल उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत निधी देण्याच्या विषयाला मंजुरी दिली.ही कामे होणारराज्य शासनाकडून प्राप्त होणाºया निधीतून वरूड येथे १० कोटी रूपयांची तर पवनार येथे ७ कोटी रूपयांची विकास कामे होणार आहेत. सदर निधीतून या दोन्ही गावात अंतर्गत रस्ते, जलनिस्सारण सांडपाणी, जलशुद्धीकरण, सौरऊर्जा संच, ग्रंथालय, सार्वजनिक जागांचे सौंदर्यीकरण, नाला व नाली बांधकाम, हायमास्ट बसविणे आदी कामे केली जाणार आहे.ग्रामस्थांनी केली आमदारांशी चर्चाप्रथमच मोठ्या प्रमाणात गावांसाठी निधी मिळाल्याचे माहिती होताच पवनारचे सरपंच अजय गांडोळे, वरूडचे सरपंच वासुदेव देवडे, पं. स. सभापती महानंदा ताकसांडे, सेवाग्राम विकास आराखडा सनियंत्रण समिती सदस्य निलेश किटे, जि. प. च्या माजी सदस्य सुनीता ढवळे, ग्रा.पं. सदस्य सुनील फरताडे, प्रमोद राऊत, अरूणसिंग, निमरोट, अशोक भट, बाळशीराम मानोले, शंकर वाघमारे, नंदा उमाटे, अर्चना डगवार, वर्षा बांगडे, जयश्री मेहर, पुष्पा बोकडे, ज्योत्सना गवळी, शुभांगी हिवरे, अरूणा काकडे, लखन, आशीष ताकसांडे आदींनी आ. डॉ. पंकज भोयर यांचे निवासस्थान गाठून विविध विषयांवर चर्चा केली.पवनारच्या धाम नदीपात्राचा होतोय विकाससेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत या आधी पवनार येथील धाम नदीच्या घाटाच्या बांधकामासाठी तसेच सौंदर्यीकरणाकरिता २१ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. सदर काम युद्धपातळीवर पूर्ण केले जात असून यामुळे पवनारच्या धाम नदी पात्राचा कायापालट होणार आहे.प्रयत्नांना यशवरुड व पवनार या दोन्ही गावांचा विकास व्हावा, या हेतूने तसेच सदर दोन्ही गावातील विविध कामांसाठी शासकीय निधी खेचून आणण्यासाठी आ. डॉ. पंकज भोयर यांनी संबंधितांकडे पाठपुरावा केला. दोन्ही गावांना मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाल्याने आमदारांच्या प्रयत्नांना यश आले आहे. शिवाय विकास कामांमुळे गावांचा कायापालट होणार असल्याने तेथील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.पवनार व वरुड या गावात विविध विकास कामे करण्यासाठी निधी मिळावा म्हणून आ. डॉ. पंकज भोयर यांनी पालमंत्री ते मुख्यमंत्रीपर्यंत वेळोवेळी पाठपुरावा केला.