शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रेतीच्या वाहतुकीने महामार्गावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:07 IST

रेती वाहतूक करणाऱ्या जड वाहनांमुळे कोल्ही ते राष्ट्रीय महामार्ग पर्यंतचा रस्ता उखडला आहे. या मार्गावरील पुलाला मोठे भगदाड पडले आहे.

ठळक मुद्देनाल्यावरील पुलाची क्षती : कार्यवाहीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतसमुद्रपूर : रेती वाहतूक करणाऱ्या जड वाहनांमुळे कोल्ही ते राष्ट्रीय महामार्ग पर्यंतचा रस्ता उखडला आहे. या मार्गावरील पुलाला मोठे भगदाड पडले आहे. दिवसाला या रस्त्याने रेतीची वाहतूक करणारे शेकडो वाहने धावतात. रस्त्याची क्षमता तुलनेने कमी असल्याने रस्त्याची दैनावस्था झाली असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.या मार्गाने रेतीची वाहतूक करणारे वाहने भरधाव जातात. त्यामुळे अन्य वाहन धारकांना अपघाताचा धोका असतो. महामार्गाने ही वाहतूक होत असताना याकडे संबधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बैलबंडी, दुचाकी असे वाहन या रस्त्याने घेऊन जाताना चालकांना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. रस्त्याच्या डागडुजीची मागणी होत आहे.अपघाताचा धोकारस्ता अरूंद असल्याने जड वाहतुकीने समस्येत अधिकच भर पडत आहे. कधीतर पादचाऱ्यांना आवागमन करायला जागा नसते. ही बाब अपघाताला निमंत्रण देत आहे. या मार्गाने रेतीची अवैध वाहतूक वाढली आहे. याकडे लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी सय्यद शफात अहमद व ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.खड्ड्यांची स्थिती जैसै थे’सेवाग्राम - हमदापूर ते सेवाग्राम मार्गावरील खड्ड्यांच्या डागडुजीचे काम सुरू आहे. मात्र यात डांबराचा वापर अत्यल्प होत असल्याची तक्रार ग्रामस्थ करतात. रस्त्यावरील गिट्टी आताच उखडली आहे. त्यामुळे दुरूस्त केलेले खड्डे जैसे थे असल्याचे दिसते. या प्रकाराने वाहन चालक व प्रवासी संताप व्यक्त करतात. सेवाग्राम-हमदापूर हा मार्ग वर्दळीचा आहे. मोठ्या प्रमाणात जडवाहतूक होते. याच मार्गावर पुढे रेतीघाट आहे. त्यामुळे रेतीची वाहतूक नित्य होत असते. परिणामी रस्ता खड्डेमय झाला आहे. मात्र डागडुजी करताना निकृष्ट काम होत असल्याचा प्रकार येथे घडत आहे.वाहन चालक व प्रवाशांना या रस्त्याने जाताना अडचणीचा सामना करावा लागतो. वाहनांच्या दुरूस्तीचा खर्च वाढला आहे. आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. खड्डेमय रस्त्याने प्रवास करताना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. या मार्गावर खड्डे बुजविण्याचे काम करताना डांबर केवळ शिंपडले जात आहे. गिट्टी भरून प्रेसिंग केली तरी ती अल्पावधीत बाहेर पडत आहे. अंबानगर परिसरातील गिट्टी उखडत आहे. गिट्टी व चुरीमुळे वाहन घसरून अपघात होण्याचा धोकाही वाढला आहे.