शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

साईनगरात महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक

By admin | Updated: August 9, 2014 23:51 IST

साईनगर परिसरात रात्री झालेल्या कृत्रिम भारनियमनामुळे संतप्त नागरिकांनी महावितरणच्या पावडे नर्सिंग होम चौकात असलेल्या कार्यालयातवर हल्ला चढविला. या कार्यालयात कोणीच कर्मचारी हजर नव्हते.

वर्धा : साईनगर परिसरात रात्री झालेल्या कृत्रिम भारनियमनामुळे संतप्त नागरिकांनी महावितरणच्या पावडे नर्सिंग होम चौकात असलेल्या कार्यालयातवर हल्ला चढविला. या कार्यालयात कोणीच कर्मचारी हजर नव्हते. अखेर येथील अभियंता व कर्मचारी दुरूस्ती करीत असल्याची माहिती मिळाली असता नागरिकांनी तिकडे आपला मोर्चा वळविला. यात अभियंत्यासह कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. यावेळी कंपनीच्या वाहनाचीही तोडफोडही करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. वेळीअवेळी होत असलेल्या भारनियमनामुळे सर्वसामान्य नागरिक चांगलेच वैतागले आहेत. अशात पावसाच्या दडीने वातवरणात आर्द्रता वाढल्याने नागरिकांना त्रास होत आहे. या परिस्थितीचा वीज गुल झाल्याने त्रास अधिक होत आहे. यातच शुक्रवारी रात्री साईनगर परिसरात वीज गेल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी एकत्र येत वीज वितरणच्या कार्यालयावर हल्ला चढविला. यात त्यांना इथे कोणीही नसल्याचे दिसल्याने ते परत जात असताना श्री निवास कॉलनी येथे दुरूस्तीच्या कामाकरिता जात असलेल्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक करून त्यांना शिवीगाळ केली. यात कर्मचारी विष्णू ठाकरे हे जखमी झाले. ठाकरे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसात रवी दुपारे यांच्यासह सात ते आठ व्यक्तीविरूद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, ३४१, ३५३, ३३७, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)