शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण कल्याण समिती नावालाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:21 IST

आठ पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा समावेश असलेली ही समिती व या समितीचे सदस्य रुग्णालयात फेरफटका मारत नसल्याचे बोलले जाते. रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात असणारी रुग्णसंख्या पाहता या रुग्णांना चांगली सुविधा मिळावी म्हणून किती कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी हवेत, याकडे समितीचे दुर्लक्ष आहे. परिणामी, येथे येणाºया रुग्णांना गर्दीमुळे तपासणीसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे.

ठळक मुद्देरुग्णालयातील सोयी सुविधांकडे दुर्लक्ष : फलकावर तत्कालीन अधिकाऱ्यांची नावे कायम

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : सेलू शहरात एकमेव असलेल्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या कल्याणासाठी नेमण्यात आलेली समिती नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे.आठ पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा समावेश असलेली ही समिती व या समितीचे सदस्य रुग्णालयात फेरफटका मारत नसल्याचे बोलले जाते. रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात असणारी रुग्णसंख्या पाहता या रुग्णांना चांगली सुविधा मिळावी म्हणून किती कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी हवेत, याकडे समितीचे दुर्लक्ष आहे. परिणामी, येथे येणाºया रुग्णांना गर्दीमुळे तपासणीसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. तर नोंदणी विभागात दोन कर्मचारी लावले असतानाही गर्दीमुळे विलंब लागतो. नोंदणीसाठी रांगेत उभा राहणाºया रुग्णाला तपासणीसाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. येथेअसलेल्या अपुºया कर्मचारी वर्गामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. याकडे लक्ष देऊन रुग्ण कल्याण समितीने हेका धरण्याची गरज आहे; पण तसे होत नाही. आठ सदस्यीय रुग्णकल्याण समितीत एक लोकप्रतिनिधी आहे तर इतर सात सदस्य शासकीय अधिकारी आहेत. यापैकी तीन अधिकाºयांची बदली झाली असताना त्यांची नावे मात्र या फलकावर कायम आहेत. या समितीतील वैद्यकीय अधीक्षक कीर्ती पाटील, वैद्यकीय अधिकारी शकील शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी पी. पी. धमाने यांची वर्षभरापूर्वी बदली झाली असताना नावे फलकावर कायम असल्याने ही रुग्ण कल्याण समिती खरेच रुग्णांना सोयी सुविधा मिळते की नाही याकडे लक्ष देत असेल का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.तालुक्यातील रुग्णांना चांगली सेवा मिळावी म्हणून असलेल्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना चांगली सेवा मिळावी व रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी आता लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :docterडॉक्टर