शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कार्यक्रम कामचुकार कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर

By admin | Updated: October 9, 2014 23:06 IST

विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. यात अनेक कामे असतात. या कामाकरिता शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. ही नियुक्ती करताना कामाकरिता येत असलेल्या नागरिकांना त्रास होणार नाही

वर्धा : विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. यात अनेक कामे असतात. या कामाकरिता शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. ही नियुक्ती करताना कामाकरिता येत असलेल्या नागरिकांना त्रास होणार नाही याकरिता काही कर्मचारी कार्यालयात असतात. वर्धेत मात्र शासकीय कार्यालयात सारेच कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र आहे. साऱ्याच विभागात शुकशुकाट आहे. निवडणुकीच्या कामात जरी नियुक्ती झाली नसली तरी काही कामचोर कर्मचारी या कारणाने कार्यालयातून बेपत्ता होत असल्याचे चित्र आहे.जिल्हा प्रशासनाच्या कोणत्याही कार्यालयात सकाळी ११ वाजताच्या सुमारास गेल्यास अर्ध्या बाकांवर कर्मचारी दिसतील तर अर्धे बाक रिकामे दिसतील. यानंतर दुपारी १ वाजताच्या सुमारास कार्यालयात जा सारेच बाक रिकामे दिसतील. यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या एखाद्या कर्मचाऱ्याला विचारणा केली असता त्याच्या तोंडून एकच उत्तर मिळते निवडणुकीच्या कामात आहे. जिल्ह्यातील सारेच कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असतील तर नागरिकांनी त्यांच्या समस्या सोडविण्याकरिता नेमके कुठे जावे असा नवा प्रश्न समोर येत आहे. आचारसंहिता असल्याने शासकीय कामे अडकली आहेत; मात्र समस्या सोडविण्यात तर आचारसंहितेची आडकाठी येत नसावी, असे सर्वसामान्यांचे म्हणणे आहे. जिल्हा प्रशासनातील पाच हजार ५६४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे, यात दुमत नाही. या कामात महसूल विभागाच्या व शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचा भरणा अधिक आहे. इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांची सख्या तशी कमीच आहे. असे असतानाही जिल्ह्यातील कृषी विभाग, आरोग्य विभागासारख्या कार्यालयात काही कामाकरिता गेले असता नागरिकांना साहेब निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे उत्तर मिळत आहे. कार्यालयात कर्मचारी नसल्याने या काळात विविध कामाकरिता येत असलेल्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.येत्या दिवसात सणांना सुरुवात होत अससल्याने गावातील नागरिक विविध शासकीय कामांकरिता वर्धेत येत आहेत. यामुळे गाव खेड्यातून विविध कामाकरिता येत असलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागत आहे. (प्रतिनिधी)