शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बोरधरण येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2015 02:27 IST

व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा प्राप्त झालेल्या बोरधरण अभयारण्यात येणारे प्रवासी आणि पर्यटकांच्या सोयीसाठी असलेल्या प्रवासी निवाऱ्याची पुरती दुर्दशा झाली आहे.

सर्वत्र वाढली झुडपे : प्रवाशांना सोसावा लागतो त्रास; छत नसल्याने झाडाचाच आश्रयसेलू : व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा प्राप्त झालेल्या बोरधरण अभयारण्यात येणारे प्रवासी आणि पर्यटकांच्या सोयीसाठी असलेल्या प्रवासी निवाऱ्याची पुरती दुर्दशा झाली आहे. प्रवासी निवाऱ्यात पाऊस आणि उन्हापासून वाचण्याऐवजी झाडांच्या सान्निध्यात रहावे लागते. त्यामुळे प्रवाशी व पर्यटक कमालीचे त्रस्त झाले आहे. जिल्ह्यातीलच नव्हे तर संंपर्र्ण विदर्भातून पर्यटक व्याघ्र प्रकल्पात वाघ व इतर प्राणी डोळ्यात टिपावे म्हणून हौसेने येतात. बसने येणाऱ्या प्रवाशांची संख्याही बरीच आहे. बसच्या प्रतिक्षेत ताटकळत असलेले प्रवाशी निवाऱ्याअभावी पानटपऱ्या व झाडांचा आश्रय शोधतात. सुमारे चार वर्षापासून या निवाऱ्याची दैना झाली आहे. छत, भिंती पडुन खंडार झाले. गवताची झुडपे वाढली आहे. मात्र कुणीही याकडे लक्ष देत नाही. नुकताच बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्याने येथील महत्व वाढले आहे. एस.टी. महामंडळाने व स्थानिक लोकप्रतिनिधीने प्रवाशी निवारा नव्याने बांधण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. परिसरातील प्रवासी या निवाऱ्याचा प्रवासासाठी आधार घेतात. परंतु निवाराच दिसत नसल्याने अनेकदा बसही थांबत नाही. पावसाळ्यात तर कुठे थांबावे असा प्रश्न प्रवाशांना पडतो. महिला प्रवाशांना जास्तीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येथे प्रवासी निवारा नव्याने बांधण्यात यावा आणि होत असलेला त्रास थांबवावा अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.(शहर प्रतिनिधी)महिलांची कुचंबना, पावसाळ्यात आडोसा शोधताना धावाधावया मार्गावरून सेलूकडे व इतरही गावाकडे नागरिक जातात. अनेक महिला रोजगारासाठी अभयारण्याकडे जात असतात. अशावेळी बसची वाट पाहात त्या या निवाऱ्याजवळ थांबतात. पावसाळ्यात पावसापासून रक्षणासाठी नागरिकांना आजुबाजूच्या झाडांचा किंवा टपरीचा आधार घ्यावा लागतो. पुरुषांना तितकासा त्रास अशावेळी होत नाही. परंतु महिलांची मात्र कुचंबना होते. नुकताच बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्याने येथील महत्व वाढले आहे. एस.टी. महामंडळाने व स्थानिक लोकप्रतिनिधीने प्रवासी निवारा नव्याने बांधण्यासाठी प्रयत्न करने गरजेचे आहे. उन्हाच्या झळा सोसत नागरिकांना स्थानकासमोर उभे राहावे लागते. पाणी पिण्याचीही येथे कुठलीही सोय नसल्याने ये जा करणारे प्रवासी सतत संताप व्यक्त करीत असतात. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोकानिवारा परिसराला झुडपांचा वेढा आहे. या कारणाने या पत्रिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर आहे. या भीतीपोटी नागरिक निवाऱ्यापासून जरा दूरच उभे राहतात. त्यामुळे या निवाऱ्याचा उपयोग काय असा प्रश्न पडतो.