शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पुलगाव-आर्वी रेल्वे मार्गाबाबत शासनाकडून पक्षपात

By admin | Updated: August 22, 2016 00:44 IST

मध्य प्रांतातील कापूस उत्पादक भाग म्हणून पुलगाव, हिंगणघाट, आर्वीचे महत्व आहे. याच भागात व्यापाराच्या दृष्टीकोनातून इंग्रजांनी पुलगाव,

रेल्वे मिशन समितीचा आरोप : पुलगाव-आर्वी व मूर्तिजापूर-यवतमाळ दोन्ही रेल्वे मार्ग निक्सन अ‍ॅण्ड कंपनीचेचपुलगाव : मध्य प्रांतातील कापूस उत्पादक भाग म्हणून पुलगाव, हिंगणघाट, आर्वीचे महत्व आहे. याच भागात व्यापाराच्या दृष्टीकोनातून इंग्रजांनी पुलगाव, आर्वी, अचलपूर, मूर्तिजापूर, यवतमाळ हा नॅरोगेज रेल्वे मार्ग निर्मित केला. येथूनच वऱ्हाडाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. स्वातंत्र्यानंतर या दोन्ही नॅरोगेज मार्गाचा निक्सन अ‍ॅड. कंपनीशी दर दहा वर्षांनी सुरू ठेवण्याचा करार भारत सरकारला करावा लागत होता. यामुळे या मार्गाचे ब्रॉडगेज मार्गात रूपांतर व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. यातच केंद्र शासनाने अचलपूर, यवतमाळ रेल्वेच्या ब्रॉडगेजसाठी १५०० कोटी रुपये दिले; मात्र पुलगाव-आर्वी नॅरोगेज रेल्वे मार्ग बंद केला. या मार्गाबाबत शासनाने पक्षपात केल्याचा आरोप १०० कि.मी मीटर रेल्वे मिशन समितीने केला आहे. येथील एका भवनात १०० कि.मी मोटर रेल्वे मिशन समितीची सभा झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर शहाकार होते. सभेत मिशनचे प्रकाश साकडे (रोहणा), प्रशांत सव्वालाखे, गौरव जाजू, श्रीकांत वाघमारे, सुनील राठी, अ‍ॅड. अवतार सिंग, बाबासाहेब गलाट, प्रमोद बोराटणे आदींनी विचार व्यक्त केले. १९१६ साली ब्रिटिशांनी या भागातील कापूस उत्पादकाचे महत्त्व लक्षात घेता पुलगाव-आर्वी ही नॅरोगेज रेल्वे सुरू केली. या ३५ किमीच्या रेल्वेमुळे पुलगाव-आर्वी दरम्यान रोहणा, विरूळ, सोरटा, धनोडी, पारगोठाण, पिंपळखुटासह इतर ग्रामीण परिसरातील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना व दूध, दही, लोण्याचा व्यवसाय करणाऱ्यांना सोईस्कर झाले होते. आर्वी परिसरातील आष्टी, मोर्शी, वरूड हा परिसर संत्रा उत्पादकांचा असल्यामुळे पुलगाव-आर्वी हा नॅरोगेज रेल्वे मार्ग वरूड व पुढे आमला या सैनिकी विभागापर्यंत वाढवून पुलगाव व आमला हे दोन संरक्षण विभाग जोडण्याचा प्रयत्नही करण्यात आला. यात पुलगाव, आमला व इटारशी ही संरक्षण विभागाची महत्त्वाची ठिकाणे या मार्गाने जोडल्या जाऊ शकत होती. देश स्वातंत्र झाला. विविध राजकीय पक्षांची सरकारे आलीत व ब्रिटीशकालीन नॅरोगेज मार्गाकडे दुर्लक्ष झाले. या दोन्ही मार्गावर अनेक संकटे आलीत. त्यातून पुलगाव, आर्वी हा रेल्वे मार्ग ३१ जुलै २००६ पासून बंद झाल्याने परिसरातील १० लाख जनतेच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम पडत आहे. याच पद्धतीने चालणाऱ्या अचलपूर, मूर्तिजापूर, यवतमाळ या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी शासनाने १५०० कोटी दिले. त्याप्रमाणे पुलगाव आर्वी मार्गासाठी राशी देवून हा मार्ग आमला पर्यंत वाढवावा, अशी मागणी करण्यात आली. सभेला भाजपा शहराध्यक्ष मंगेश झाडे, गिरीश चौधरी, शाबिर कुरेशी, कपील शुक्ला, अ‍ॅड. अजय तिवारी, मनोज पनपालिया, मधुकर रेवतकर, आशिष गांधी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)