शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

वर्दळीचे रस्तेच झालेत वाहनतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:10 IST

मोदींच्या सभेकरिता जिल्हाभरातून चारचाकी वाहनांच्या माध्यमातून नागरिक शहरात दाखल झाले. या वाहनांनी चक्क रस्त्यांवरच कब्जा केल्याने रस्त्यांना वाहनतळाचे स्वरूप आले होते, तर वाहनतळाची नियोजित ठिकाणे रिकामीच पाहायला मिळाली. या प्रकारामुळे शहरातील विविध मार्गांवर वाहतूकव्यवस्था कोलमडली.

ठळक मुद्देनियोजित वाहनतळांवर तुरळक वाहने

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मोदींच्या सभेकरिता जिल्हाभरातून चारचाकी वाहनांच्या माध्यमातून नागरिक शहरात दाखल झाले. या वाहनांनी चक्क रस्त्यांवरच कब्जा केल्याने रस्त्यांना वाहनतळाचे स्वरूप आले होते, तर वाहनतळाची नियोजित ठिकाणे रिकामीच पाहायला मिळाली. या प्रकारामुळे शहरातील विविध मार्गांवर वाहतूकव्यवस्था कोलमडली.नरेंद्र मोदी यांची स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर सभा आयोजित होती. याकरिता वाहनतळाची व्यवस्था न्यू इंग्लिश हायस्कूलचे मैदान, सर्कस मैदान, शितलामाता मंदिराचे प्रांगण आदी ठिकाणी आयोजकांकडून करण्यात आली होती. जिल्ह्यातील विविध भागांतून नागरिक सकाळपासूनच वर्ध्यात दाखल झाले. दरम्यान आर्वी मार्गावर चारचाकी वाहनांची लांबच लांब रांग लागलेली होती. आर्वी नाका चौकात पाच रस्त्यांचा संगम झालेला आहे. आर्वी अखंडितपणे वाहने येत असल्याने या चौकात वाहतुकीचा बराच काळ खोळंबा झाला.नियोजित ठिकाणी असलेले वाहनतळ आणि सभास्थळ यात मोठे अंतर असल्याने चारचाकी वाहनधारकांनी शहरात जागा मिळेल तेथे आणि रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली. स्वावलंबी विद्यालय परिसरातील मार्ग आणि बॅचलर रोडच्या दुतर्फा केवळ चारचाकी वाहनेच दिसून येत होती. यामुळे वाहनतळे रिकामीच होती. या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांचा प्रचंड त्रास सहन करावा लागला.अडीच ते तीन किलोमीटर पायपीटमोदींच्या सभेकरिता आलेली वाहने सभास्थळापर्यंत वाहतूक आणि सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी जाऊ दिली नाही. यामुळे सेलू तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांनी धुनिवाले चौक परिसरातच वाहने उभी करून रखरखत्या उन्हात पायी वारी सुरू केली. मुख्य प्रवेशद्वार गर्जना चौक ते श्रीनिवास मार्गाकडून असल्याने सभास्थळापर्यंत नागरिकांनीचक्क अडीच ते किलोमीटर पायपीट केली. सभा संपत असताना नागरिकांची पायपीट सुरूच होती.