शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंकज रामदास तडस प्रकरण; पीडितेने जारी केला व्हिडिओ, माझ्या जिवाला धोका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 20:07 IST

Wardha news भाजपचे खासदार रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस याने लग्नाचे आमिष दाखवित शारीरिक शोषण केल्याची तक्रार दाखल करणाऱ्या पीडित मुलीने बुधवारी एक व्हिडिओ जारी करीत आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्याकडे मदतीची याचना केली.

ठळक मुद्दे रूपाली चाकणकर मदतीला धावल्या पोलीस आयुक्तांशी केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपचे खासदार रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस याने लग्नाचे आमिष दाखवित शारीरिक शोषण केल्याची तक्रार दाखल करणाऱ्या पीडित मुलीने बुधवारी एक व्हिडिओ जारी करीत आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्याकडे मदतीची याचना केली. या व्हिडिओची दखल घेत चाकणकर यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी संपर्क साधला. एवढेच नव्हे तर काही वेळातच पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांना पाठवून पीडितेला धीर दिला. (Pankaj Tadas case; Video released by the victim, my life is in danger ...)

वर्धा शहरातील रहिवासी असलेल्या तरुणीने नागपूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे या प्रकरणी तक्रार केली आहे. बुधवारी पीडितेने चाकणकर यांना मदतीची याचना करणारा व्हिडिओ पाठविला. 'मी... रूपालीताई चाकणकरांना मदत मागते. माझ्या जीवाला धोका आहे. मॅडम, मला प्लीज येथून घेऊन चला. मी रिक्वेस्ट करते.' अशी कळकळीची विनंती पीडितेने या व्हिडिओत केली आहे. चाकणकर यांनी लगेच या व्हिडिओची दखल घेतली. भाजपचे खासदार रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस हे पीडितेला मारहाण करीत असून त्रास देत आहेत. आपण या प्रकरणी विशेष लक्ष घाला, अशी मागणी चाकणकर यांनी पोलीस आयुक्तांना फोन करून केली. सोबतच पक्षाच्या नागपुरातील पदाधिका?्यांनाही फोन करून पीडितेची मदत करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी पीडितेच्या जीविताला तडस यांच्या गुंडापासून धोका असून त्यांना त्वरित पोलीस संरक्षण देऊन रामदास तडस,त्यांचा मुलगा व कुटुंबातील सदस्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी केली.

चित्रा आता का गप्प का?- पीडितेचा व्हिडिओ चाकणकर यांनी ट्वीट केल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.महिला अत्याचाराचा पुळका असणाऱ्या भाजप नेत्या कुठे बिळात लपून बसल्या आहेत, त्या आता गप्प का, असे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित करण्यात आले.खा. तडस यांना फडणवीसांचा समन्वयाचा सल्ला- राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष रूपाली चाकनकर यांनी जो व्हिडिओ ट्विट केला, त्या संदर्भात आपले खा. रामदास तडस यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांच्या मुलाचे व त्या महिलेचे रजिस्टर मॅरेज झाले आहे. त्यांना मी सल्ला दिला की हा विषय समन्वयाने सोडवला पाहिजे. कायद्याचा कुठे अनादर होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही केल्या असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस