शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
2
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
3
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
4
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
5
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
6
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
7
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
9
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
10
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
11
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
12
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्जमध्ये आला 'बेबी एबी'; अशी आहे टी२० कारकीर्द
13
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
14
"मी ज्या झोपडपट्टीतून आलोय...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवची सणसणीत चपराक
15
गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील
16
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
17
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
18
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
19
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...

आष्टी तालुक्यात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:07 IST

पूर्वीच या परिसरातील पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्यासह पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशातच मागील १५ दिवसांत १२ जनावरांचा बिबट्याने फडशा पाडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने याप्र्रकरणी योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.

ठळक मुद्दे१५ दिवसांत १२ जनावरे ठार : वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : पूर्वीच या परिसरातील पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्यासह पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशातच मागील १५ दिवसांत १२ जनावरांचा बिबट्याने फडशा पाडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने याप्र्रकरणी योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.पाण्याच्या शोधार्थ सध्या अनेक वन्यप्राणी गाव आणि शेतशिवारांकडे आपला मोर्चा वळवित आहेत. अशातच गोठ्यातील आणि शेतात बांधून असलेल्या जनावरांना गतप्राण करण्याचा सपाटा बिबट्याने लावल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोणातून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गस्त सुरू केली आहे. असे असले तरी बिबट्याही विविध गावांच्या परिसरात प्रवेश करून आपली दहशत कायम ठेवत आहे. सोमवार २० मे रोजी रात्री बेलोरा (बु.) येथील शेतकरी रवींद्र जाणे यांच्या मालकीचे वासरू बिबट्याने ठार केले. हे वासरू गोठ्यात बांधून होते. सकाळी ही घटना लक्षात आली. माहिती मिळताच सरपंच मिलिंद जाणे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी, वनरक्षक रसिका अवथळे यांना माहिती दिली.वाघाने पाडला बकरीचा फडशाबोरधरण : बोर व्याघ्र प्रकल्पा जवळील बोरी गावातील एका शेळीपालकाच्या मालकीच्या बकरीवर पट्टदार वाघाने हल्ला करून तिला गतप्राण केले. या घटनेमुळे शेळीपालक नरेश किरडे यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय परिसरात पट्टेदार वाघाची दहशत निर्माण झाली आहे.बोरी येथील नरेश किरडे हे नेहमीप्रमाणे शेत शिवारात गावातील बकºया चारण्यासाठी गेले होते. दरम्यान झुडूपात दबा धरून बसून असलेल्या पट्टेदार वाघाने बकºयांच्या कळपावर हल्ला केला. शिवाय एका बकरीला गतप्राण केले. आरडा-ओरड केल्यानंतर वाघाने घटनास्थळावरून धुम ठोकली. त्यानंतर इतर बकºयांना एकत्र करीत त्यांना गावाच्या दिशेने हाकलण्यात आल्याने इतर बकºयांचे प्राण बचावले. वाघाने बकरी गतप्राण केल्याने शेळीपालकाचे ९ हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद हिंगणी वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी घेतली आहे. नुकसानग्रस्ताला तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.वनविभागही हतबलया परिसरात वनविभागाच्यावतीने गस्त घातली जात आहे. मात्र, बेलोरा, खंबीत, देलवाडी, जोलवाडी, अंबिकापूर, पिलपूर, येनाडा, लहान आर्वी, जैतापूर या गावाच्या हद्दीत बिबट्या काळोखाचा फायदा घेत प्रवेश करून पाळीव जनावरांना ठार करीत असल्याने पशुपालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या परिसरात सध्या दोन बिबट्यांचा मुक्तसंचार होत असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.वन्यप्राणी गावाकडे फिरकतात यासाठी गस्त लावली आहे. मात्र, रात्रीला बिबट पाळीव प्राण्यांवर हल्ले करीत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे गस्तही वाढविण्यात आली आहे.- अमोल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, आष्टी (शहीद).