शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वेगळ्या विदर्भासाठी पानफूल आंदोलन

By admin | Updated: April 2, 2015 02:05 IST

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जनजागृती घडवून आणण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिलेल्या निर्देशानुसार वायगाव (नि.) चौरस्ता

वर्धा : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जनजागृती घडवून आणण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिलेल्या निर्देशानुसार वायगाव (नि.) चौरस्ता व जाम येथे प्रतिकात्मक पानफुल आंदोलन केले़ दुपारी १२ ते ४ पर्यंत चाललेल्या या आंदोलनात बसेससह सर्व वाहने थांबवून प्रवाशांना फूल व माहितीपत्रक देऊन वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीची गरज समजाऊन सांगण्यात आली. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीचे आंदोलन तीव्र करण्यासाठी जनतेने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही प्रवाशांना करण्यात आले.५४ वर्षे महाराष्ट्रात राहून आणि २० वर्षांपूर्वी वैधानिक विकास मंडळाची स्थापना होऊनही विदर्भाचा विकास झाला नाही. विदर्भ निर्मितीच्या वेळी करण्यात आलेला नागपूर करार पाळण्यात आला नाही. लोकसंख्येच्या तुलनेने विदर्भासाठी आर्थिक तरतूद करण्याचे वचन सत्ताधाऱ्यांनी कधीच पाळले नाही. यामुळे विदर्भप्रदेश ओसाड झाला. अनुशेष (बॅकलॉग) ७५ हजार कोटींनी वाढला. शेतीमालास रास्त भाव न मिळाल्याने शेतकरी आत्महत्या वाढल्या. औद्योगिक विकास न झाल्याने बेरोजगारी वाढली. सिंचनाची सोय न झाल्याने शेतीतील गरिबी वाढली. आदिवासीबहूल क्षेत्रातील कूपोषण वाढले. गरजेपेक्षा दुप्पट वीज निर्मिती विदर्भात होऊनही भारनियमन वाढले. नक्षलवाद वाढला़ विदर्भात वायूप्रदूषण वाढले. यामुळे श्वसनरोगाचे गंभीर आजार वाढले. रोजगारीच्या शोधात वैदर्भीय जनता स्थलांतर करीत असल्याने राज्याची लोकसंख्या वाढत असूनही विदर्भाची लोकसंख्या घली़ यासह अन्य बाबींची प्रवाशांना जाणीव करून देण्यात आली.आंदोलनात स्वतंत्र भारत पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष सरोज काशीकर, महासचिव गंगाधर मुटे, दत्ता राऊत, सतीश दाणी, धोंडबा गावंडे, शेख बाबा, संध्या राऊत, डॉ. सुधाकर महाकाळकर, डॉ. पोकळे, अरविंद राऊत, गणेश मुटे, नारायण होले, शांताराम भालेराव, संतोष लाखे, निलेश फुलकर, भारत लाखे, रवींद्र दांडेकर, प्रवीण पोहाणे, विनोद काळे, अजय फुलझेले, खुशाल हिवरकर यांच्यासह शेकडो आंदोलक सहभागी झाले़(कार्यालय प्रतिनिधी)