शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पंचधारा प्रकल्पातील कर्मचाऱ्यांची वसाहत देशोधडीला

By admin | Updated: May 26, 2017 00:53 IST

सेलू तालुक्यातील चार सिंचन प्रकल्पांपैकी रिधोरा हा मध्यम प्रकल्प आहे. या विभागात कार्यरत अधिकारी

मुलभूत सोई-सुविधांची वानवा : कर्मचारी करतात ‘अप-डाऊन’लोकमत न्यूज नेटवर्कझडशी : सेलू तालुक्यातील चार सिंचन प्रकल्पांपैकी रिधोरा हा मध्यम प्रकल्प आहे. या विभागात कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता शासनाने लाखो रुपये खर्च करीत कार्यालय व निवासस्थानाची व्यवस्था केली; पण सध्या वसाहत देशोधडीला लागली आहे. मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने अधिकारी व कर्मचारी सोईच्या ठिकाणावरून ये-जा करतात. परिणामी, आपली कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांना त्यांचा शोध घ्यावा लागतो. अगदी गावालाच लागून सिंचन विभागाचे कार्यालय आणि शेवटच्या घटका मोजत असलेल्या मोठ्या इमारती म्हणजे कर्मचाऱ्यांचे क्वॉर्टर आहे. या निवासस्थानांची दुरवस्था झाल्याने अधिकारी वा कर्मचारी राहत नाही. शेतकऱ्यांना तक्रारींसाठी उपविभागीय अधिकारी पाटबंधारे सेलू कार्यालय गाठावे लागते. यामुळे शेतकऱ्यांना मानसिक, शारीरिक तथा आर्थिक त्रास सहन करावा लागतो. सिंचन कार्यालय परिसरात कालवाच्या दुरूस्तीसाठी वापरात येणारे लाखो रुपयांचे साहित्य बेवारस पडून आहे. यातील काही चोरीला गेल्यास त्याची नोंद कार्यालयात आहे की नाही, हा प्रश्नच आहे. याबाबत कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता आम्ही निवासस्थानी राहण्यास तयार आहोत; पण शासनाने आम्हाला सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असे सांगण्यात येते. वास्तविक, शासनाने या निवासस्थान व कार्यालयाची दुरूस्ती करणे गरजेचे आहे; पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. असे असले तरी शासन अधिकारी, कर्मचाऱ्यांना घरभाडे व इतर भत्ते देते. यामुळे कर्मचाऱ्यांनी कार्यालयाजवळ गावात वास्तव्य करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. रबी हंगामात शेतकऱ्यांना या प्रकल्पातून सिंचनाकरिता पाणी दिले जाते. त्यावेळी कुठलाही कर्मचारी रात्रीपाळीत हजर राहत नाही. यामुळे पंचधारा प्रकल्पाचे काम रामभरोसे चालत असल्याचे चित्र आहे. कार्यालय दुरूस्तीकरिता निधी मागितला आहे. निवासस्थानांसाठीही निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे; पण शासनाकडेच निधी नसल्याने देणार कुठून. आधी तालुका व जिल्हास्थळाचा विचार केला जातो. नंतर ग्रामीण भागातील निवासस्थान दुरूस्तीचा प्रस्ताव मंजूर केला जातो. सिंचन प्रकल्पाच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. यापूढे शेतकऱ्यांना पाणी देण्याचे काम सोसायटीकडे जाणार आहे. त्यांना शासनाकडून कार्यालय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी जुन्या वसाहतीच्या इमारती कार्यालय म्हणून दिल्या जाणार असल्याची माहिती शाखा अभियंता झाडे यांनी दिली.