शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पॅकेज नको धोरणात्मक सहाय्य हवे

By admin | Updated: July 19, 2014 01:39 IST

भारत हा कृषिप्रधान देश असून त्याची अर्थव्यवस्था

मुलाखत : विजय जावंधिया यांची माहितीश्रेया केने  वर्धाभारत हा कृषिप्रधान देश असून त्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे, ही वाक्ये नियमित आपल्या कानावर पडतात. तरीही या देशातील शेतकऱ्यांची अवस्था दरिद्री नारायणा सारखी. ही तफावत का, कारण प्रश्नाच्या मुळाशी आजवर काम केले गेले नाही. सरकार जोवर शेतकऱ्यांच्या पाठिशी असणार नाही तोपर्यंत हे असेच चालू राहील. केवळ योजनांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना लाभ होणार नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वकाही, असा गमजा जरी सरकार मारत असले तरी ते किती फोल आहे ते शेतकऱ्यांच्या विदारक स्थितीवरून लक्षात येते. शेतीला भरघोस पॅकेज नको तर पॉलीसी सपोर्टची गरज आहे, अशी माहिती कृषी अभ्यासक विजय जावंधिया यांनी दिली. यंदा मान्सूनने हुलकावणी दिल्याने सर्वत्र दुष्काळाची स्थिती उद्भवत आहे. पाऊसच आला नसल्याने पेरण्या खोळंबल्या. काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. कृषी विभागाचा पेरणी आराखडा निष्प्रभ ठरण्याची वेळ आली आहे. या दुष्काळ स्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने काय पावले उचलावी, यासंदर्भात ‘लोकमत’ने त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी शेतीवरील वाढत्या खर्चामुळे शेतकरी कशाप्रकारे कर्जाच्या खाईत लोटत आहे, यावर प्रकाश टाकला. अमेरिकेत आजही कपाशीचे संकरीत बियाणे वापरत नाही. मग भारतातील शेतकऱ्याला अत्यंत महागडे संकरीत बियाणे वापरण्याचा सल्ला का दिला जातो. सरकार आणि बियाणे कंपन्या यांचे असलेले आर्थिक लागेबांधे शेतकऱ्याच्या मुळावर उठत आहे. या बियाण्यांच्या वापरामुळे शेतकरी बियाण्यांच्या बाबतीत विसबूंन आहे. शासनाने नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी दीर्घकालीन उपाय करण्याची गरज आहे. गावागावात पर्जन्यमापक यंत्रणा बसवावी, गावस्तरावर पीक विमा योजना राबवावी आणि उंबरठा उत्पन्नानुसार मदत जाहीर करण्याची गरज आहे. भारताच्या कृषी विषयक धोरणातील महत्वपूर्ण त्रुटी म्हणजे कृषीविषयक निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे तर शेती हा घटनेप्रमाणे राज्य शासनाचा विषय आहे. या विसंगती मुळेच सर्व बारगळत आहे. शासनाचा कृषी क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन निराशाजनक आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही कृषीला थोडफार देऊ केल आहे. अशाने शेतकरी बांधवाची स्थिती कशी सुधारेल. विदर्भाचे कृषी क्षेत्र हे कोरडवाहू आहे. मात्र नेहमी विसंगत धोरण राबविण्याचा प्रत्यय येतो. आजवरच्या कमकुवत धोरणाचा परिपाक म्हणजे शेतीची अशी अवनिती दिसून येत आहे. - विजय जावंधिया