लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील वैद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने मागील दोन वर्षापासून जलजागृृती व जल संवर्धन मोहीम राबविली जात आहे. गावोगावी फिरुन जलबचतीच्या विविध उपायोजना ग्रामस्थांच्या मदतीने राबविली जात आहे. याचीच दखल घेत पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी वैद्यकीय जनजागृती मंचाशी संपर्क साधत त्यांनी निर्माण केलेल्या आॅक्सिजन पार्कसह विविध उपक्रमांची पाहणी केली.वैद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने ओसाड पडलेल्या हनुमान टेकडीवर १५ हजार झाडांच्या रोपणाने हिरवा शालू पांघरला आहे. येथे तिरंगा प्रोजेक्ट, पावसाच्या पाण्याचे सीसीटीच्या साहाय्याने पुनर्भरण, पाणीशुद्धीकरण प्रकल्पातील ३ लाख लिटर वेस्ट वॉटर चे डीप सीसीटीच्या साहाय्याने नियोजन, प्रोजेक्ट रेन गन तसेच घरगुती रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादी लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहे. याचीच माहिती जाणून घेण्यासाठी पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सज्यजित भटकळ यांनी वर्ध्यातील जनजागृती मंचाची भेट घेऊन सर्व उपक्रमांची पाहणी केली. यावेळी पाणी फाऊंडेशनचे मंदार देशपांडे व भूषण कडू उपस्थित होते. वैद्यकीय जनजागृृती मंचाचे संस्थापक जलनायक तथा बालरोगतज्ज्ञ डॉ. सचिन पावडे यांनी सत्यजित भटकळ यांचे स्वागत केले. व्हीजेएमच्या हनुमान टेकडीवरील विविध उपक्रमांसह आॅक्सिजन पार्कची पाहणी केल्यानंतर त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. तसेच मंचाच्यावतीने आजपर्यंत जसे निस्वार्थी समाजोपयोगी कार्य केले तसेच कार्य यापुढेही अधिक जोमाने करण्याचे आवाहन करीत पाणी फाऊंडेशन स्पर्धा २०१९ च्या स्पर्धेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती दिली.वैद्यकीय जनजागृती मंचाचे सदस्य डॉ. प्रशांत वाडीभस्मे यांच्या स्वरचित व स्वरबध्द केलेल्या ‘डोसक फिरलंय आता ह्या पाण्यासाठी’ ह्या वर्धेच्या पाणी कप स्पर्धेतील बहूचर्चित गीताचा आनंदही उपस्थितांनी घेतला. यावेळी डॉ. आनंद गाढवकर, बोबडे, प्रा. श्याम भेंडे, सचिन गरपाल, मोहन मिसाळ, सुहास इंगळे यांच्यासह व्हिजेएमचे सदस्य उपस्थित होते.
आॅक्सिजन पार्कची पाणी फाऊंडेशनकडून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 22:45 IST
शहरातील वैद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने मागील दोन वर्षापासून जलजागृृती व जल संवर्धन मोहीम राबविली जात आहे. गावोगावी फिरुन जलबचतीच्या विविध उपायोजना ग्रामस्थांच्या मदतीने राबविली जात आहे. याचीच दखल घेत पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी वैद्यकीय जनजागृती मंचाशी संपर्क साधत त्यांनी निर्माण केलेल्या आॅक्सिजन पार्कसह विविध उपक्रमांची पाहणी केली.
आॅक्सिजन पार्कची पाणी फाऊंडेशनकडून दखल
ठळक मुद्देव्हीजेएमच्या कामाची पावती : सत्यजित भटकळ यांनी जाणली माहिती