शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

रसुलाबादच्या ‘गंदगीमुक्त गाव’ची सातासमुद्रापार चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 21:30 IST

Wardha News राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील या गावाची शॉर्ट फिल्म जगाला सध्या स्वच्छतेचा संदेश देत आहे.

ठळक मुद्दे युट्युबवर पाच हजाराहून अधिक व्ह्यूज गांधी जयंतीनिमित्य उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी तालुक्यातील सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या रसुलाबाद या गावाची चर्चा आता युट्युबच्या माध्यमातून संपूर्ण जगात होत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील या गावाची शॉर्ट फिल्म जगाला सध्या स्वच्छतेचा संदेश देत आहे. विशेष म्हणजे, रसुलाबाद या गावातील लघु चित्रपटाला आतापर्यंत पाच हजारांहून अधिक व्व्हयुज मिळाले आहेत.

सरपंच म्हणून रसुलाबादची धुरा सांभाळणारे राजेश सावरकर यांनी ही एक नवीन संकल्पना अमलात आणली. त्यांनी याची माहिती त्यांच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत सचिव, जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्या नंतर सर्व संमतीने रसुलाबाद या गावात गंदगीमुक्त गाव या लघु चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. याच चित्रिकरणादरम्यान गावातील प्रत्येक व्यक्तीने स्वच्छ आणि सुंदर गावाचा संकल्प सोडला. त्यानंतर या गावाचा आता चेहराच बदलला आहे. सध्या या गावाची चर्चा युट्युब या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगात होत आहे. आतापर्यंत सदर लघुपटाला पाच हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून ३१८ व्यक्तीनी त्याला लाईक्स दिले आहेत. तर केवळ सात व्यक्तींनी लघुपट आवडला नसल्याचा अभिप्राय नोंदविला आहे.रसुलाबाद ग्रामपंचायतने बनविलेल्या शॉर्ट फिल्मला आतापर्यंत ५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ही संकल्पना पूर्णत्त्वास जाण्यासाठी जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी, पं.स.चे गटविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायतीतील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले आहे. त्यामुळे सरपंच म्हणून हे माझे एकट्याचे यश नव्हे तर सामुहिक प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे.- राजेश सावरकर, सरपंच, रसुलाबाद.

टॅग्स :Short Filmsशॉर्ट फिल्म