शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाचा बंधारा गाळानेच ‘ओव्हरफ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:58 IST

भूजल पातळीत वाढ होऊन सिंचनासाठी फायदा व्हावा या उद्देशाने शासनाने कृषी विभागाच्या वतीने छोट्या-मोठ्या नाल्यांवर सिमेंट बंधारे बांधण्यात आले. त्यानंतर काही बंधाऱ्यातील गाळ उपसण्यात आला, तर काही बंधारे गाळानेच ओव्हरफ्लो झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देविहिरींच्या पाणीपातळीत घट : शेतकरी सिंचनापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कसेलगाव (लवणे) : भूजल पातळीत वाढ होऊन सिंचनासाठी फायदा व्हावा या उद्देशाने शासनाने कृषी विभागाच्या वतीने छोट्या-मोठ्या नाल्यांवर सिमेंट बंधारे बांधण्यात आले. त्यानंतर काही बंधाऱ्यातील गाळ उपसण्यात आला, तर काही बंधारे गाळानेच ओव्हरफ्लो झाल्याचे पाहावयास मिळत आहे.कारंजा तालुक्यातील धर्ती गावाच्या क्षेत्रात येणाऱ्या मौजा भालू शिवारातून वाहणाऱ्या नाल्यावर कृषी विभागाच्या वतीने रूपचंद मानमोडे यांच्या शेताजवळ १० वर्षाआधी बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली. या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांनी सिंचनासाठी केल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडली. परंतु, मागील पाच वर्षांपासून या बंधाऱ्यातील गाळ न उपसल्यामुळे पावसाच्या पाण्याचा संचय होत नाही. पाणी पूर्णत: वाहून गेल्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घट झाली आहे.शासनाच्या जलयुक्त शिवारअंतर्गत नाला सरळीकरण व खोलीकरण करण्यात आले. परंतु, या नाल्याचे काम करण्यात आलेले नाही. या बंधाऱ्यातील गाळ काठापर्यंत भरलेला असूनही याकडे कुणाचेही लक्ष नाही.शासन पाणी अडविण्यासाठी पाणी अडवा-पाणी जिरवा यासह अन्य उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करीत असताना हा भाग अपवाद कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातील गाळ काढून नाल्याचे खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे.पाणीसंचयात बाधाशेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी म्हणून बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. परंतु संबंधितांकडून नाल्यांची देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने बंधारे गाळयुक्त होत असून शेतकऱ्यांना सिंचनापासून मुकावे लागत आहे.या बंधाऱ्यांच्या निर्मितीमुळे विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. परंतु, बंधारा गाळाने भरल्यामुळे पाणी अडल्या जात नाही. त्यामुळे विहिरींची पातळी खालावली आहे. बंधाऱ्यांतील गाळ उपसण्यात यावा.- रूपंचद मानमोडे, शेतकरी, धर्ती.