एल. एस. सोनवणे : जिल्हास्तरीय शालेय लगोरी स्पर्धा, १७ संघ सहभागीवर्धा : लगोरीसारखा खेळ शालेय खेळात सहभागी झाला. हा आपला पारंपरिक खेळ असून शरीराच्या सर्व अवयवांचा व्यायाम या खेळात होतो. त्यामुळे लहान मुलांनी लगोरी हा ग्रामीण खेळ खेळला पाहिजे, असे विचार माजी शिक्षणाधिकारी एल. एस. सोनवणे यांनी व्यक्त केले.क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा. पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा आणि जिल्हा लगोरी असोसिएशन वर्धाच्या वतीने स्थानिक यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर १९ वर्षाखालील मुलामुलींच्या जिल्हास्तरीय शालेय लगोरी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सोनवणे बोलत होते. कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. देशमुख यशवंत तर अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी ओमकांता रंगारी, क्रीडा अधिकारी चैताली राऊत, लगोरी असोसिएशनचे सचिव उमेश गायकवाड, संघटनेचे अध्यक्ष रमेश निमसडकर, प्रा. भालेराव उपस्थित होते. सोनवणे यावेळी म्हणाले, हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला असून कमी पैशात हा खेळ खेळला जातो. त्यामुळे काही वर्षात या खेळाकडे खेळाडू आकर्षित होत आहे. तसेह जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करून नावारूपास आणण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असे मत डॉ. देशमुख यांनी व्यक्त केले. संघटनेचे सचिव उमेश गायकवाड यांनी जिल्ह्यात लगोरी या खेळाला सर्वोच्च स्थान प्राप्त करून देण्यास व उत्कृष्ट खेळाडूची निर्मिती करण्यास आपण कटीबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष रमेश निमसडकर यांनी केले. संचालन स्वप्नील सहारे यांनी केले. आभारउपाध्यक्ष अनिल मुळे यांनी मानले. या स्पर्धेत मुलामुलीच्या १७ संघानी सहभाग घेतला. मुलांचा अंतिम सामना सनशाईन विद्यालय सेवाग्राम विरूद्ध कस्तुरबा विद्या मंदिर, सेवाग्राम यांच्यात झाला. यात सनशाईन विद्यालयाने ३-२ ने विजय संपादन केला. मुलींमध्ये सुद्धा सनशाईन विद्यालय सेवाग्राम विजयी तर कस्तुरबा विद्या मंदिर उपविजयी ठरले. स्पर्धेचे पंच म्हणून उमेश गायकवाड, स्वप्नील सहारे, सौरभ भगत, इंद्रजित धाकटे यांनी काम पाहिले.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. भालेकर, भावेकर, भाकरे, संजय सुकळकर, अरूण हुड, अशोक खन्नाडे, लांबट, राहुल झामरे, प्रवीण पोळके, पप्पू पाटील, रजनी गायकवाड, लता डायगव्हाणे, मुख्याध्यापिका रेड्डी यासह विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)
लगोरीमुळे शरीराचा सर्वांगीण व्यायाम
By admin | Updated: November 30, 2015 02:03 IST