शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

उन्नत शेतीतून ६,३९० शेतकरी समृद्धीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:22 IST

शेतकऱ्यांना शेतीचा अनुभव आहे; पण त्यांच्याकडून होत असलेली शेती ही पारंपरिक पद्धतीचीे आहे.

१,५६० हेक्टरवर विकसित तंत्रज्ञानाने शेती : बियाण्यांच्या क्षमतेनुसार उत्पादनाचे उद्दिष्टलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना शेतीचा अनुभव आहे; पण त्यांच्याकडून होत असलेली शेती ही पारंपरिक पद्धतीचीे आहे. यामुळे त्यांना अपेक्षित उत्पन्न होण्याची हमी कमी आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालण्याकरिता शासनाने राबविलेल्या ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अभियानातून वर्धा जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ३९० शेतकऱ्यांनी समृद्धीची वाट धरल्याचे दिसून आले आहे. शेती शेतकऱ्यांची, तंत्रासह बियाणे आमचे; पण उत्पन्न तुमचे असे म्हणत शासनाने राज्यात हे अभियान सुरू केले आहे. या अभियानातून शेतकऱ्यांना लागवड व पेरणीच्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात येत आहे. या अभियानात सहभागी शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञ प्रशिक्षण देत असून त्यांच्या मार्गदर्शनातून वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण १ हजार ५६० हेक्टरवर विकसित तंत्राने शेती सुरू आहे. या अभियानात शेतकऱ्यांकडून वापरण्यात येत असलेल्या बियाण्यांच्या क्षमतेनुसार उत्पादनाचें उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. अभियानात प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांकडूनच दुसऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचाही प्रयोग होत आहे. यातून शेतकऱ्यांचा विश्वास वाढणार असल्याचेही कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. अभियानात सहभागी शेतकऱ्यांना शासनाच्या कंपनीचे बियाणे देण्यात आले आहे. या बियाण्यावर काही शेतकऱ्यांनी अविश्वास दर्शविल्याने त्यांना त्यांच्या पसंतीचे बियाणे वापरण्याचीही मुभा देण्यात आली आहे. याची रक्कम शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून परत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.