शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरचे बेपत्ता, आतल्यांवर मात्र मेहरनजर

By admin | Updated: June 27, 2015 02:44 IST

विविधा केंद्रात विविध कामांकरिता येत असलेल्या विद्यार्थ्यांना व सर्वसामान्यांना दलालांच्या हस्तक्षेपामुळे

वर्धा : विविधा केंद्रात विविध कामांकरिता येत असलेल्या विद्यार्थ्यांना व सर्वसामान्यांना दलालांच्या हस्तक्षेपामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याचा भंडाफोड ‘लोकमत’ने शुक्रवारी स्टींग आॅपरेशनच्या माध्यमातून करताच लक्ष इमारतीच्या आवारात असलेले दलाल बेपत्ता झाल्याचे शुक्रवारी बघायला मिळाले; मात्र इमारतीच्या आत असलेले दलाल कायमच होते. या दलालांवर प्रशासनाची मेहरनजर असल्याची चर्चा विविधा केंद्राच्या आवारात सुरू होती. दहावी-बारावीचे निकाल लागताच उच्च शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कागदपत्राची गरज भासते. ती पूर्ण करण्याकरिता विद्यार्थ्यांची विविधा केंद्रात आॅनलाईन अर्ज करण्याकरिता गर्दी वाढली आहे. याच संधीचा लाभ घेण्यासाठी दलाल सक्रिय झाले आहे. येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून तर त्याचे प्रमाणपत्र मिळविण्यापर्यंतचा अलिखीत करार करण्याची पद्धत येथे रूढ झाली आहे. ही बाब ‘लोकमत’ने प्रशासनाच्या नजरेत आणून दिली. यावर कारवाईच्या नावाखाली सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या कॅमऱ्यात अद्याप एकही दलाल गवसू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या कॅमेऱ्यासमक्षच हा प्रकार सुरू असताना तो कॅमेऱ्यात कैद होणे क्रमप्राप्त आहे. असे असताना यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. मग कॅमेऱ्यांची उठाठेव कशाकरिता, असा प्रश्न समोर येत आहे. केंद्रात सुरू असलेल्या या दलालांना प्रशासनातील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याने आपले काहीच बिघडत नाही, अशा अर्विभावात दलाल वागत आहे. यामुळेच कॅमेऱ्यासमोर टेबल लावून ते बसत आहेत. येथे येणाऱ्यांना थेट काय पाहिजे, याची विचारणा त्यांच्याकडून आहे. या कारणाने इमारतीच्या आत असलेले दलाल कायम आहे. ‘लोकमत’चे वृत्त झळकताच इमारतीच्या आवारातील दलालांनी पलायन केले. आतील दलाल हे येथील अधिकाऱ्यांशी असलेल्या आर्थिकसंबंधामुळे कायम आहेत, असेही बोलले जात आहे.(प्रतिनिधी)