लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोविड बाधितांच्या संख्येने ६०० चा टप्पा पार केला आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण व शहरी भागात आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. या परिस्थितीत आरोग्य कर्मचारी कसे काम करीत आहे. यंत्रणा किती सजग व दक्ष आहे याची माहिती सोमवारी लोकमत चमूने प्रमुख शासकीय रुग्णालयात जाऊन जाणून घेतली. शहरी व ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर काम करीत असल्याचे दिसून आले. वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी बहुतांशी रुग्णालयांत वेळेवर पोहोचून चांगली आरोग्य सेवा देत असल्याचे बघावयास मिळाले. तसेच बाह्य रुग्ण विभागात रुग्णांनाही सामाजिक अंतराचे भान असल्याचे दिसले.दररोज ओपीडीत होतेय ५०० रुग्णांची तपासणीवर्धा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेण्यास गेलेल्यांना चार ओपीडीतील चार डॉक्टरांकडून वेळीच उपचार केले जात आहे. मात्र, येथे बहूदा सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याचे बघावयास मिळाले. या रुग्णालयात ऐरवी प्रत्येक दिवशी सातशे ते आठशे रुग्णांची ओपीडी असते. मात्र, कोरोना संकटामुळे ओपीडीच्या संख्येत घट झाली आहे. सध्या ४०० ते ५०० रुग्ण दररोज उपचार घेण्यास येत आहे. सोमवारी ओपीडी वेळीच उघडल्याचे आणि योग्य पद्धतीने रुग्णांना उपचार दिल्या जात असल्याचे बघावयास मिळाले. मात्र, येथे रुग्णांकडून हॅण्डवॉशची सुविधा, सोशल डिस्टन्स न ठेवता सर्रास रुग्ण वावरताना दिसून आले.डिस्टन्सिंगचा फज्जाजिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्यरुग्ण नोंदणी करताना कुठेही सामाजिक अंतर राखण्यात येत नसल्याचे दिसून आले. तसेच कुठेही हॅण्डवॉशची व्यवस्था नसल्याचे दिसून बघावयास मिळाले. त्यामुळे या रुग्णालयात रुग्णांवर जरी उपचार वेळेवर होत असले तरी त्यांच्या सुरक्षेविषयी उपाययोजना राबविण्यास रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.मी सेलू तालुक्यातील मोही येथून सकाळी रुग्णालयात आलो. चिठ्ठी काढून लगेच डॉक्टरांकडे आरोग्य तपासणीसाठी गेलो. तेव्हा डॉक्टरांनीही वेळ वाया न जाऊ देता उपचार सुरु केले.- राहुल बोंदाडे, रा. मोही, तालुका सेलू.माझ्या हाताला गंभीर जखम झाल्याने मी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलो आहे. कोरोना काळातही या रुग्णालयातील डॉक्टरांकडून योग्य उपचार मिळत असल्याने मी त्यांच्या कामाबाबत नक्कीच समाधानी आहे.- बंडू भोयर, रा. बोरगाव (मेघे).ग्रामीण रुग्णालयात मुबलक औषधसाठाकारंजा (घा.) : येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी वेळेत पोहलेले दिसून आलेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्यावरील कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी पीपीई किट घालून काम करीत होते. रुग्णालयात येणाऱ्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून घेतले जात होते. कोरोना काळातही या रुग्णालयात मुबलक औषधसाठा असल्याचे सांगण्यात आले. कोरोना संकटाच्या काळातही येथील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर काम करीत असल्याचे बघावयास मिळाले.वेळेवरच पोहोचतात डॉक्टर, कर्मचारीसमुद्रपूर : ग्रामीण रुग्णालयात ओपीडी व आदी विभागात सर्व डॉक्टर तसेच परिचारीका आदी वेळेवर हजर होते. रुग्णांची गर्दी असली तरी पीपीई कीट घातलेले वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी रुग्णांना वैद्यकीय सेवा देत असल्याचे बघावयास मिळाले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून रांगेत असलेल्या रुग्णांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात सोडले जात होते. सुरक्षा रक्षकाकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा अशा सूचना दिल्या जात होत्या.
कोरोना काळातही बाह्यरुग्ण विभाग ‘अलर्ट मोड’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:00 IST
जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्यरुग्ण नोंदणी करताना कुठेही सामाजिक अंतर राखण्यात येत नसल्याचे दिसून आले. तसेच कुठेही हॅण्डवॉशची व्यवस्था नसल्याचे दिसून बघावयास मिळाले. त्यामुळे या रुग्णालयात रुग्णांवर जरी उपचार वेळेवर होत असले तरी त्यांच्या सुरक्षेविषयी उपाययोजना राबविण्यास रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
कोरोना काळातही बाह्यरुग्ण विभाग ‘अलर्ट मोड’वर
ठळक मुद्देइतर आजारांच्या रुग्णसंख्येत कमालीची घट : शासकीय रुग्णालयात कोविड बचावासाठी सर्व व्यवस्थाही परिपूर्ण