शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

मैदानी खेळांना ‘खेलो इंडिया’ मुळे मिळाला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 21:52 IST

परंपरागत खेळाचा राजाश्रय संपल्याने मधल्या काळात बऱ्याचशा खेळांना अवकळा आली होती. परंतु आजच्या स्थितीत ‘खेलो इंडिया’ व ‘सीएम’ चषकाच्या आयोजनातून कबड्डी व कुस्तीच्या खेळाला उजाळा मिळाला आहे. तसेच हे मैदानी खेळ जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न होत आहे, असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरामदास तडस : खासदार चषक विदर्भस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : परंपरागत खेळाचा राजाश्रय संपल्याने मधल्या काळात बऱ्याचशा खेळांना अवकळा आली होती. परंतु आजच्या स्थितीत ‘खेलो इंडिया’ व ‘सीएम’ चषकाच्या आयोजनातून कबड्डी व कुस्तीच्या खेळाला उजाळा मिळाला आहे. तसेच हे मैदानी खेळ जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न होत आहे, असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.देवळी येथील विदर्भ केसरी खासदार तडस स्टेडीयमवर फे्रन्डस् ग्रुपच्यावतीने खासदार चषक विदर्भस्तरीय पुरूष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून सहकार नेते व माजी आमदार प्रा.सुरेश देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सभापती मिलिंद भेंडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनंत देशमुख, साबाजी स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष मोहन अग्रवाल, नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, गटनेता शोभा तडस व उद्योजक विनोद घीया यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना १०० खेळाडूंना दत्तक घेवून त्यांना धडे दिले जाणार आहे. तसेच पुढच्या वर्षी कुस्तीचे हिंद केसरी सामने, कबड्डीची आॅल इंडिया स्पर्धा व व्हॉलीबॉलचे राज्यस्तरीय सामने आयोजित करणार असल्याचे खा. तडस यांनी सांगितले. राष्ट्रीय स्तरावरील हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचला आहे. खेळाला चांगले दिवस आणण्यासाठी सर्वस्तरीय प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत सहकार नेते प्रा. सुरेश देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. प्रारंभी पुलवामा घटनेतील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. १७ ते १९ फेब्रुवारीपर्यंत होणाºया या स्पर्धेसाठी विदर्भातील महिला व पुरूष गटातील ३४ संघ सहभागी झाले आहे. खुल्या गटातील ही स्पर्धा पाहण्यासाठी देवळी व परिसरातील क्रीडाप्रेमींनी गर्दी केली आहे.उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक निलेश कसनारे व संचालन अंकुश देशमुख यांनी केले. तर आभार तेजस देशमुख यांनी मानले. या कार्यक्रमाला नगर परिषदेचे सभापती नंदू वैद्य, मारोती मरघाडे, मिलिंद ठाकरे तसेच अमोल कसनारे, प्रणव जोशी यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी मंगेश वानखेडे, स्वप्नील राऊत, गिरीष तुमाने, किशोर कामडी, योगेश नाखले, विनोद तराळे, आसीफ ईकबाल, मुरली लेखनार, गोलू तराळे, प्रवीण तराळे, गोल्डी बग्गा, भरत फटींग व कार्यकर्र्ते परिश्रम घेत आहे.