शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शंभरावर परीक्षार्थी केंद्राबाहेर

By admin | Updated: March 30, 2015 01:45 IST

पोस्टाच्या परीक्षेकरिता असलेल्या सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात रविवारी परीक्षा देण्याकरिता आलेल्या अनेक बेरोजगार युवक-युवतींना ...

वर्धा : पोस्टाच्या परीक्षेकरिता असलेल्या सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात रविवारी परीक्षा देण्याकरिता आलेल्या अनेक बेरोजगार युवक-युवतींना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. परीक्षेच्या हॉल तिकिटासह इतर दुसरे ओळखपत्र नसल्याने या परीक्षार्थ्यांना परीक्षा देण्यापासून मज्जाव करण्यात आला. परीक्षा देण्याबाबत विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या पर्यवेक्षकाला विनंती केली असता त्यांनी ती धुडकावून लावली. केंद्र शासनाच्या पोस्ट विभागात पोस्टमन या जागेकरिता रविवारी परीक्षा होती. यात जिल्ह्यातीलच नाही तर इतर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी परीक्षेचा आॅनलाईन अर्ज भरला. यामुळे आॅनलाईनच हॉल तिकीट आली. परीक्षा देण्याकरिता हॉल तिकीट तर महत्त्वाचे आहेच शिवाय या हॉल तिकिटावर दुसरे एखादे ओळखपत्र आणण्याच्या सूचना नसमूद करण्यात आल्या होत्या. ठरलेल्या या पदाकरिता यानुसार रविवारी परीक्षा होती. वर्धेतील विविध महाविद्यालय या परीक्षेकरिता केंद्र देण्यात आले होते. यात सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय एक केंद्र होते. दुपारी ३ वाजता परीक्षा असल्याने काही काळपूर्वीच परीक्षार्थी येथे पोहोचले. यावेळी त्यांचे ओळखपत्र तपासून त्यांना खोलीत बसविण्यात आले. यावेळी ओळखपत्रासह दुसरे एखादे ओळखपत्र दाखविण्याची मागणी केंद्रावर करण्यात आली. यावेळी परीक्षार्थ्यांनी याच ओळखपत्रावर परीक्षेला उपस्थित राहू देण्याची मागणी केली. मात्र ज्यांच्याकडे दुसरे ओळखपत्र नाही अशा विद्यार्थ्यांना परीक्षेला उपस्थित राहण्यास मज्जाव करण्यात आला. इतर परीक्षा केंद्राचर मात्र असा प्रकार झाला नसल्याची ओरड यावेळी करण्यात आली. शिवाय काही परीक्षार्थ्यांना परीक्षेदरम्यान हॉल तिकीट तपासून अर्धा पेपर सोडविल्यानंतर बाहेर काढण्यात आले. त्यांना तुम्ही जेवढा पेपर सोडविला तेवढा जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. यावर संतापलेल्या विद्यार्थ्यांना आम्हाला परीक्षेला उपस्थित राहण्याची विनवणी केंद्राच्या पर्यवेक्षकाला केली. त्यांना इतर केंद्रावर असे नसल्याचे सांंगितले; मात्र त्यांनी यावर थेट नकार दिल्याने विद्यार्थ्यांना आल्या पावली परत जावे लागले. पेपर संपताच पेपर फुटल्याची चर्चा जोरात झाली. याच परीक्षा केंद्रावर असलेल्या एका युवकाच्या मोबाईलवर एका प्रश्नाचे उत्तर वॉट्स अ‍ॅपवर आल्याची चर्चा जोरात असून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी होत होती. (प्रतिनिधी)