पराग मगर - वर्धापोटासाठी काहीतरी करावच लागतं. आमचं पोट मात्र इतरांच्या मरणावर चालतं. रस्त्याच्या कडेला उभ्या ठेवलेल्या तिरडीच्या बांबूचाच आधार घेत ८५ वर्षांचे दादाजी मसराम आपली व्यथा सांगतात. कुणालाही आयुष्यात येऊच नये अशी वाटणारी गोष्ट म्हणजे मृत्यू. पण तेच जगातील अंतिम सत्य असल्याने त्यापासून कुणाचीही सुटका नाही. माणसाच्या मरणानंतर त्याला स्मशानघाटात नेण्यासाठी तिरडीची आवश्यकता असते. कुणाच्याही घरी मय्यत झाल्यावर आधी तिरडीची गरज भासत असली तरी असा व्यवसाय करीत असलेल्यांकडे मात्र कुस्सीत नजरेने पाहिले जाते. दादाजी सांगतात की, लहानपणापासूनच घरी तिरडी बनविणे तसेच बांबूच्या टोपल्या बनविण्याचा व्यवसाय चालायला. आधी टोपल्यांना प्रचंड मागणी होती. त्यामुळे तोच मुख्य व्यवसाय होता. पण आता टोपल्या केवळ काहीच प्रसंगांना घेतल्या जातात. त्यामुळे तिरडी विकणे हाच काही वर्षांपासून मुख्य व्यवसाय झाला आहे. लोकं मरतात म्हणून आमचा व्यवसाय चालतो असं कधी कधी वाटूनही जातं, पण तीही समाजाची गरज आहे. आम्ही ती गरज भागवतो याच काहीसं समाधान असल्याचही दादाजी सांगतात.
दुसऱ्यांच्या मरणावर चालतो आमचा संसार
By admin | Updated: February 7, 2015 23:28 IST