शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विश्वाच्या पसाऱ्याची सुरूवातच वनस्पतीच्या अस्तित्वापासून

By admin | Updated: February 2, 2017 00:52 IST

मनुष्याचं जीवन निसर्ग आणि झाडाझुडूपांनी वेढलेले आहे. विश्वाच्या पसाऱ्याची सुरूवातच वनस्पतीच्या अस्तित्वापासून झाली.

राजेंद्रसिंह : हुतात्मा स्मारक परिसरात कार्यक्रम वर्धा : मनुष्याचं जीवन निसर्ग आणि झाडाझुडूपांनी वेढलेले आहे. विश्वाच्या पसाऱ्याची सुरूवातच वनस्पतीच्या अस्तित्वापासून झाली. मानवी जीवनाच्या आधीपासून हे हिरवेपण आपली सोबत करीत आहे. वृक्षतोड झाल्याने धरणी ओसाड होत गेली. तिच पूर्वस्वरूप प्राप्त करायचं असेल तर वृक्ष लागवड ही जन चळवळ व्हावी, असे प्रतिपादन प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी केले. स्मृतिवृक्ष लागवडीसारख्या संकल्पनेतून ही धरती हिरवी करण्यास मदत होईल. आपल्या संस्कृतीतील वृक्षपूजन हे निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. माणसं उलट वागत गेल्याने निसर्गाची अपरिमीत हानी झाली आहे, असे पुढे बोलताना राजेंद्रसिंह म्हणाले. निसर्ग सेवा समिती वर्धाद्वारे हुतात्मा स्मारक परिसर, सेवाग्राम येथे कार्यक्रम घेण्यात आला. महात्मा गांधी स्मृतिदिनानिमित्त राजेंद्रसिंह सेवाग्राम येथे आले असताना त्यांचे व्याख्यान घेण्यात आले. यावेळी परिसरात वृक्षोरापण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, गांधी विचार परिषदेचे निदेशक भरत महोदय, जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने, डॉ. सोहम पंड्या, बापूराव देशमुख अभियांत्रिकी सेवाग्रामचे प्राचार्य डॉ. महेंद्र गायकवाड, प्रकाश येंडे, डॉ. हेमचंद्र वैद्य यांची उपस्थिती होती. निसर्ग सेवा समितीचे संस्थापक, कोषाध्यक्ष, अजाबराव गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्मृतीवृक्षरोप मान्यवरांच्या उपस्थितीत लावण्यात आले. वर्धा शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण चळवळ पुढे नेण्यात अजाबराव यांचे योगदान मोठे आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी दिली. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी यावेळी समायोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रभाकर गायकवाड, प्रा. जयंत गंडोले, रत्नाकर मिसाळ, विष्णूजी मसने, रमेश परिमल, अडसड, नितीन, पद्मा गायकवाड, सरीता आवते, रविंद्र शिंदे, विनय आवते, रामराव नाकाडे, रामराव माहुरे व परिसरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. उपस्थितांचे आभार सचिव सुभाष ढोबळे यांनी मानले. बा.दे. हांडे यांनी अमर जीवन संदेश वाचून राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.(स्थानिक प्रतिनिधी)