शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चातून वाढीव आरक्षणाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 21:26 IST

आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य निर्णय घेण्यात यावा. तसेच ५० टक्केच्यावर आरक्षण नसावेच या मुख्य मागणीसाठी हिंदू, मुस्लिम, जैन, सिख, ईसाई आदी धर्माच्या बांधवांनी एकत्र येऊन रविवारी वर्धा शहरातून मोर्चा काढला. हे आंदोलन सेव्ह मेरीट सेव्ह नेशन समितीच्या नेतृत्त्वात करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर मोर्चाचा समारोप अनेकान्त स्वाध्याय मंदिर येथे झाला.

ठळक मुद्देयोग्य कार्यवाहीसाठी खासदारांसह आमदारांना साकडे : मुख्यमंत्र्यांनाही पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य निर्णय घेण्यात यावा. तसेच ५० टक्केच्यावर आरक्षण नसावेच या मुख्य मागणीसाठी हिंदू, मुस्लिम, जैन, सिख, ईसाई आदी धर्माच्या बांधवांनी एकत्र येऊन रविवारी वर्धा शहरातून मोर्चा काढला. हे आंदोलन सेव्ह मेरीट सेव्ह नेशन समितीच्या नेतृत्त्वात करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर मोर्चाचा समारोप अनेकान्त स्वाध्याय मंदिर येथे झाला. याप्रसंगी खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर यांना आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. सदर मोर्चात तरुण-तरुणी, महिला-पुरूष तसेच बच्चेकंपनी आणि वयोवृद्धही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.समारोपप्रसंगी दोघांनी केले मनोगत व्यक्तसदर मोर्चाचा समारोप अनेकांत स्वाध्याय मंदिराच्या आवारात झाला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन खा. तडस व आ. भोयर यांना सादर करण्यात आले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. मोर्चाच्या समारोपीय कार्यक्रमादरम्यान नागपूरचे डॉ. अनिल लद्धड, डॉ. राजेंद्र चांडक यांनी मनोगत व्यक्त केले.बालकही उतरले रस्त्यावरसदर मोर्चाचे नेतृत्त्व १२ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांनी केले. ‘मेरीट का अब यह है कहना... मुश्किल हो गया इस देश मे रहना’ अशा आशयाचा मजकुल लिहून असलेला फलक हातात घेऊन ते या मोर्चात सहभागी झाले होते.तरुण-तरुणींनी नोंदविला निषेधआरक्षणाच्या मुद्यावरून नागरिकांमध्ये रोष निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. ज्या व्यक्तीला खरोखर आरक्षणाची गरज आहे त्यांना आरक्षण देण्यात यावे. शिवाय आरक्षणाची मर्यादा ५० टक्केच्यावर जाता कामा नये, अशी मागणी आंदोलनात सहभागी झालेल्या तरुण-तरुणींनी केली.शिवाय सरकारच्या दुर्लक्षित धोरणाचा यावेळी निषेध नोंदविला.मोर्चात यांचा राहिला सिंहाचा वाटामोर्चाच्या आयोजनाकरिता महाराष्ट्र ब्राह्मण सभा, उत्तर भारतीय समुदाय, पंजाबी सेवा समिती, सिंधी पंचायत, गुजराती समाज, अग्रवाल समाज, जैन समाज, माहेश्वरी समाज, कोमठी समाज, बोहरा समाज, कच्छी समाज, मुस्लिम समाजाच्या संघटनेच्या प्रतिनिधींचे विशेष सहकार्य लाभले. इतकेच नव्हे, तर समाजबांधवांनी या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. मोर्चादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसादसदर मोर्चात विविध धर्माच्या महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यांनी आंदोलनात सहभागी होऊन वाढीव आरक्षणाच्या विरोधात आवाज बुलंद केला.स्वच्छ शहराचा उद्देश जोपासलाआंदोलनात सहभागी झालेल्यांना ठिकठिकाणी पिण्याचे पाणी वितरीत करण्यात आले. परंतु, पाणी पिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रिकामा कागदी ग्लास रस्त्यावर टाकू नये या उद्देशाने ठिकठिकाणी खरड्याच्या कचराकुंडी ठेवण्यात आल्या होत्या. याच कचरापेट्यांमध्ये आंदोलकर्त्यांनी पाणी प्यायल्यानंतर रिकामा झालेला ग्लास टाकून स्वच्छ शहराचा उद्देश जोपासला असे म्हटल्यास वावगे ठरू नये.योग्य कार्यवाहीसाठी उद्धव ठाकरेंना घालणार साकडे -सराफशिवसेना पक्षप्रमुखांनी माझ्यासारख्या खुल्या प्रवर्गातील व्यक्तीला जिल्हाप्रमुख म्हणून नेमले. शिवसेना पक्षात कधीही जातीपातीचा भेदभाव झालेला नाही. ‘मेरिट बचाओ राष्ट्र बचाव‘ हे अभियान कोणत्याही जातीचे अहित करणारे नाही. सर्वांना समान आणि गुणवत्तेनुसार न्याय मिळावा हाच एकमेव उद्देश आहे. याबाबत आज निवेदन प्राप्त झाले. मी जिल्हाप्रमुख म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सदर प्रकरणी योग्य कार्यवाहीची मागणी करून सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी विनंती करणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश सराफ यांनी दिली.व्यापाऱ्यांनीही रविवारी दुपारी १२ पर्यंत प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला.